नवी दिल्ली 28 मार्च : कधी-कधी जंगलातून जाताना वन्य प्राण्यांचा सामना करावा लागतो. तसं मनुष्य बंद वाहनात असेल तर प्राणी त्यांना इजा करू शकत नाहीत, परंतु जेव्हा हत्ती सारख्या शक्तिशाली प्राण्याला सामोरे जावं लागतं तेव्हा मात्र गोष्ट वेगळी असते. कारण प्रत्येकाला माहिती आहे की त्यांच्यात मोठ्या वाहनांना देखील उलटण्याची ताकद असते. अशा वेळी एखाद्या वाहनासमोर हत्ती आला, तर वाहनातील लोक घाबरणं साहजिकच आहे. सापाचा खतरनाक स्टंट; घराच्या उंच छतावरुन मारली उडी, घटना कॅमेऱ्यात कैद एक धक्कादायक पण रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये असंच एक दृश्य कैद करण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक चारचाकी जंगलातून जात असल्याचं दिसत आहे, ज्याच्या अगदी जवळून एक हत्ती येतो. अशा स्थितीत चालक रिव्हर्स गिअरमध्ये वाहन लावतो. या दरम्यान वाहनाच्या आत असलेले लोक हिंदू देवता गणेशाचे मंत्र जपताना ऐकू येतात.
गाडी मागे जात असतानाच हत्तीही गाडीजवळ न जाता रस्त्याच्या कडेला जातो. खरं तर, एक वेळ अशी येते जेव्हा हत्ती आपली सोंड उंचावतो, जणू तो या प्रवाशांना पुढच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देत आहे. हत्तीचा हा व्हिडिओ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
हत्ती समोर येताच पर्यटक मंत्रोच्चार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप पोस्ट करताना, आयपीएस अधिकाऱ्याने लिहिलं, “जेव्हा ब्राह्मणांनी भरलेली गाडी जंगली हत्तीला भेटते…” हा व्हिडिओ आतापर्यंत 76 हजारहून अधिकांनी बघितला आहे. तर, 1500 हून अधिकांनी लाईक केला आहे.