वाघाचा पर्यटकांवर हल्ला
नवी दिल्ली 28 एप्रिल : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. व्हायरल क्लिपमध्ये काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र हे लोक एका वाघाच्या हद्दीत पोहोचताच हा वाघ भडकतो. यानंतर, रागाने तो पर्यटकांच्या दिशेने उडी मारण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून गाडीत बसलेल्या महिला भीतीने जोरजोरात ओरडू लागल्या. यानंतर काय होतं, ते तुम्हीच व्हिडिओमध्ये पाहा.
हा व्हिडिओ उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, आपल्या परिसरात वाहनांची हालचाल पाहून वाघ भडकतो. यानंतर रागाच्या भरात तो गाडीत बसलेल्या पर्यटकांना घाबरवण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. वाघाचे हावभाव पाहून असं दिसतं की तो पर्यटकांच्या इथल्या उपस्थितीने अजिबात खूश नाही.
यानंतर काहीच वेळात तो पर्यटकांच्या दिशेने उडी मारण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून गाडीत बसलेल्या महिला घाबरतात आणि आरडाओरडा करू लागतात. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लोकांना विचारलं आहे की, जेव्हा कोणी तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तुम्ही काय कराल? मगर मेलेली समजून काढत होते फोटो; अचानक घडलं भयंकर, Video व्हायरल IFS सुशांत नंदा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जंगलात वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे पट्टेदार वाघदेखील चिडला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 67 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे.