जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मगर मेलेली समजून काढत होते फोटो; अचानक घडलं भयंकर, Video व्हायरल

मगर मेलेली समजून काढत होते फोटो; अचानक घडलं भयंकर, Video व्हायरल

मगरीच्या हल्ल्याचा व्हिडीओ

मगरीच्या हल्ल्याचा व्हिडीओ

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रसिद्धीसाठी लोक मजेशीर गोष्टींपासून भयानक स्टंटपर्यंत सर्वच करताना दिसून येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल : सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रसिद्धीसाठी लोक मजेशीर गोष्टींपासून भयानक स्टंटपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. अनेकदा त्यांचे हे भयानक स्टंट त्यांच्याच अंगलट येतात. याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आणखी एख व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मगर हा पाण्याच्या आत राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, जो जमिनीवरही राहू शकतो. मगरी तोंड उघडून पाण्यातून बाहेर येतात आणि कित्येक तास त्याच स्थितीत पडून सूर्याचा आनंद लुटताना दिसतात. व्हिडिओमध्ये असेच दृश्य पाहायला मिळत आहे. जेव्हा मगर विश्रांती घेत आहे आणि अजिबात हालचाल करत नाही. तेव्हा काही लोक तिला मृत समजून तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ बनवू लागतात.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुले मगरीच्या मागे बसलेली दिसतात. दुसरीकडे, एक महिला निष्काळजीपणे मगरीच्या जवळ जाऊन त्याच्या तोंडाजवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी, मगर खूप अस्वस्थ होते आणि अचानक हल्ला करते. त्यामुळे ती महिला जखमी होताना दिसत आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती जीव वाचवण्यासाठी मागे सरकत आहे. ही घटना घडताना कॅमेरा पकडणाराही हादरुन जातो.

जाहिरात

दरम्यान, हा व्हायरल होणारा व्हिडीओ Earth Reels नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यापूर्वी असे भयानक व्हिडीओ समोर आले आहेत ज्याला पाहून हृदयाचा ठोका चुकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात