टायगर शार्कचा हल्ला
नवी दिल्ली 08 जुलै : समुद्र किनारा सगळ्यांनाच भुरळ घालतो. उंच जाणाऱ्या लाटा मनाला शांती आणि आराम देतात. त्यामुळे दरवर्षी लाखो लोक समुद्रकिनारी फिरण्यासाठी जातात. तिथे वेळ घालवतात. पण काही लोकांना लाटांशी खेळायला आवडतं. ते वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही घेतात. मात्र पाण्यात पाय ठेवण्याआधी पाण्यातील धोके आणि नियम याची माहिती असणंही अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा कोणाचीही तिच अवस्था होईल, जी या व्यक्तीची झाली. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेत त्याचा जीव थोडक्यात वाचला. मगरीनेच दुसऱ्या मगरीला जिवंत चावून खाल्लं; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद, VIDEO ट्विटरवर @blabla112345 नावाच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती बोट घेऊन समुद्रात बोटिंग करण्यासाठी जात असल्याचं तुम्ही पाहू शकता. तो खूप आतमध्ये जातो. त्याने अगदी मनसोक्त बोट राईडचा आनंद लुटला. पण मग त्याला एक मोठा ‘राक्षस’ पाण्यातून त्याच्या दिशेनं येताना दिसला. अचानक एक मोठा शार्क पाण्याच्या वरती आला आणि थेट बोटीवर हल्ला केला.
टायगर शार्क बोटीला त्याच्या टोकदार जबड्याने चावतो, हे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र ही बोट तोडणं आता शक्य नाही, असं जाणवताच हा शार्क पुन्हा पाण्यात जातो. हे पाहून बोटीवर असलेल्या व्यक्तीला काही काळ धक्का बसतो आणि तो चांगलाच घाबरतो. हा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत 23 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सही घाबरले. एकाने लिहिलं की, त्या व्यक्तीने फायबर ग्लासची बोट घ्यायला हवी होती. अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं योग्य नाही. इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.