नवी दिल्ली 08 जुलै : पृथ्वीतलावर असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना पाहून अंगावर काटा येतो. त्यांचा सामना करण्याचं धाडस क्वचितच कोणी करू शकतं. या धोकादायक प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तज्ज्ञ प्राणीसंग्रहालयात ठेवले जातात, जे त्यांच्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवतातही. पण शेवटी ते प्राणीच आहेत, ते कधी आणि काय करतील आणि कोणावर हल्ला करतील याचा काही भरवसा नाही. अशा भयंकर प्राण्यांमध्ये मगरींचाही समावेश होतो. ज्यांच्यापासून दूर राहणंच चांगलं. हे असे प्राणी आहेत, जे स्वतःच्या साथीदारांनाही मारून खातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक मगर दुसऱ्या मगरीचा पाय चावताना आणि खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगली भागात अनेक मगरी पडल्या आहेत. दरम्यान, अचानक एक मगरी शेजारी पडलेल्या दुसऱ्या मगरीचा पुढचा पाय तिच्या जबड्यात दाबते आणि चावू लागते. काही सेकंदात ती मगर दुसऱ्या मगरीच्या पाय चावते आणि खाऊनही टाकते. असं भयानक दृश्य तुम्ही याआधी क्वचितच पाहिलं असेल.
एखादा प्राणी आपल्याच प्रजातीच्या प्राण्याचा पायाला चावून खातो, असं क्वचितच पाहायला मिळतं. मात्र हे मगरींमध्ये बरेचदा घडतं. भूक लागल्यावर ते स्वतःच्या पिल्लांनाही मारून खातात. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर wildlife011 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 40 हजारांहून अधिक लोकांनी लाईक देखील केला आहे. महापौरांनी मगरीशी केलं लग्न, किस घेताना Video व्हायरल या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.काहींनी म्हटलं की, मगरी आपल्या साथीदारांना खातात हे खरं आहे. तर काहींनी म्हटलं, की हे अतिशय भयानक दृश्य आहे.