JOIN US
मराठी बातम्या / Viral / इवल्याशा बदकामुळे खतरनाक वाघालाही फुटला घाम; हा VIDEO एकदा पाहाच

इवल्याशा बदकामुळे खतरनाक वाघालाही फुटला घाम; हा VIDEO एकदा पाहाच

वाघ आणि बदकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : वाघाशी पंगा नको रे बाबा! माणूसच नव्हे तर कित्येक प्राण्यांनाही वाघाची भीती वाटते. वाघाला पाहताच तेसुद्धा धूम ठोकतात आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण एका छोट्याशा बदकाने मात्र वाघासोबत असं काही केलं आहे, जे मोठ्या प्राण्यांनाही जमणं शक्य नाही. वाघ आणि बदकाचा हा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. छोट्याशा बदकाने वाघाची चांगलीच दमछाक केली आहे. समोर असूनही वाघाला बदकाला पकडणं काही शक्य झालं नाही. यावेळी वाघाची अवस्थाही पाहण्यासारखी होती. VIRAL VIDEO - छाती ताणून महाकाय सापाला पकडायला गेले पण…; शेवट एकदा पाहाच व्हिडीओत पाहू शकता पाण्यात बदक आणि वाघ आहे. वाघ बदकाची शिकार करण्यासाठी म्हणून पाण्यात उतरला. पण बदक त्याच्या समोर असूनही त्याला पकडता येत नव्हतं आणि याचं कारण म्हणजे जे कौशल्य बदकाकडे होते ते या वाघाकडे नव्हतं आणि ते म्हणजे पाण्यात सहज लपून चकवणं. बदक पाण्यातून बाहेर येत, वाघाच्या नजरेत पडतं, वाघ संधी साधत त्याच्यावर हल्ला करायला जातं. पण शेवटी वाघाचा हात रिकामाच राहतो आणि बदक पाण्यात दुसऱ्याच ठिकाणी दिसतं. असं किती तरी वेळा होतं. तरी वाघ बदकाला पकडण्याचा प्रयत्न करतं आणि तितक्याच वेळा बदकही वाचतं. जणू काही ते वाघासोबत लपाछपीच खेळतं आहे. अचानक बैलाने व्यक्तीवर केला हल्ला, पुढे घडलं असं की…धोकादायक Video @Rainmaker1973 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बदकाच्या हुशारीला अनेकांनी दाद दिली आहे.

म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो. बदकाकडे वाघासारखी शक्ती नाही पण त्याच्याकडे वाघापासून वाचण्याची युक्ती मात्र आहे आणि तीच त्याच्या कामी येताना दिसते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या