व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधीत नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते व्हिडीओ कधी एखाद्या चांगल्या क्षणाचे असतात, तर कधी खतरनाक शिकारीचे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पण हा व्हिडीओ आश्चर्यकारक आहे, कारण त्यामध्ये जे घडलं ते आपल्याला विश्वास न बसणारं आहे. हा व्हायरल व्हिडीओ वाघ, गाय आणि तिचं वासरु याच्याशी संबंधीत आहे. आता हे तर सर्वांना माहिती आहे की, वाघ हा सगळ्यात खतरनाक शिकाऱ्या प्राण्यांपैकी आहे. त्याच्या हातात एखादा प्राणी लागली की तो संपलाच. पण या व्हिडीओत मात्र वेगळंच पाहायला मिळाल.
या व्हिडीओत वाघ शिकारीसाठी पाळीव प्राण्यांच्या पाठी पळताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या तावडीत एक वासरु लागतं. हा वाघ त्या वासराचा पाठलाग करतो आणि त्या वासराला पकडणार इतक्यात गाय तिथे येते. आश्चर्य म्हणजे गायीला तेथे पाहताच वाघ तिला घाबरतो आणि वासराला तिथेच सोडून पळ काढतो. Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभे राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि… वाघला वाटलं असतं तर तो गायीची देखील शिकार करु शकला असता, पण गायीनं देखील तसा विचार केला नाही, तिला फक्त आपल्या वासराला वाचवणं एवढंच दिसत होतं. परिणामी तिच्या वासराचे प्राण वाचले. तसेच गायीचे धाडस पाहून वाघनेच तिथून पळ काढण्याचा निश्चय घेतला.
हा व्हिडिओ IFS अधिकारी @susantananda3 यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला लाखोवेळा पाहिलं गेलं आहे. तसेच लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. लोकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटत आहे.