वाघाने जबड्यात पकडला हात
नवी दिल्ली 12 जुलै : सिंह, वाघ, चित्ता किंवा इतर हिंस्त्र प्राणी व्हिडिओमध्ये पाहायलाच चांगले वाटतात. प्रत्यक्षात ते समोर येताच भीतीने कोणाचाही थरकाप उडतो. पिंजऱ्यात बंदिस्त असले तरी या प्राण्यांसोबत खेळणं अतिशय घातक ठरू शकतं. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे. पण काही लोक असे असतात, जे या सगळ्याचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्राण्यांच्या जवळ जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती वाघासोबत मस्ती करताना दिसत आहे. मग पुढे वाघाने जे केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल. @wildlifeanimall नावाच्या Instagram अकाऊंटवर अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ पोस्ट केले जातात. या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक माणूस वाघाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसत आहे. वाघाजवळ जायची हिंमतही कोणी करत नाही, पण या व्यक्तीच्या मनात काहीतरी आलं आणि त्याने पिंजऱ्यात आपला पूर्ण हात घातला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे दृश्य प्राणीसंग्रहालयातील असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये एक वाघ पिंजऱ्यात बंद आहे. बाहेर उभा असलेला एक व्यक्ती त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. तो वारंवार वाघाच्या पिंजऱ्यात हात घालतो. सुरुवातीला वाघ इकडे-तिकडे चालायला लागतो, पण नंतर काही वेळ ती व्यक्ती हात बाहेर काढत नाही. शेवटी हा वाघ व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडतो. वाघ त्याचा हात चावायला लागतो. हे पाहून तो व्यक्ती आणि त्याचा व्हिडिओ बनवणारा व्यक्तीही घाबरून ओरडू लागतात आणि वाघाच्या तोंडातून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतात.. व्हिडिओच्या शेवटी जमिनीवर भरपूर रक्त पडलेलं दिसतं. पाळीव मांजरीचा मालकावरच भयानक हल्ला; शेवटपर्यंत सोडलं नाही, थरारक घटनेचा Video या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, त्याने या अपघाताविषयी बातमीत पाहिलं होतं, की त्या व्यक्तीचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता. दुसऱ्याने म्हटलं की, हल्ल्यानंतर तो ओरडायला का लागला? आधी त्याला काय वाटलं, की वाघ त्याला हातावर पैसे देईल? एकाने गमतीने म्हटलं, की तो चांगला माणूस आहे, त्याने वाघाला खाण्यासाठी आपला हात दिला.