वाघाने काय केलं पाहा
नवी दिल्ली 14 मे : काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. यामुळेच या धोकादायक प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करूनही लोक त्यांच्याजवळ जाण्यास टाळाटाळ करतात. सध्या सोशल मीडियावर वाघाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघ माणसांना आपल्या शक्तीची जाणीव करून देताना दिसत आहे. खरं तर, माणसांनी वाघाला पिंजऱ्यात ठेवलेला पाळीव प्राणी समजून त्याच्याजवळ जाऊन फोटो काढले, पण त्याच्या एका डरकाळीमुळे त्यांची अवस्था बिकट झाली. यानंतर त्यांनी लगेचच घाबरून तिथून पळ काढला. प्रँक करण्याची हौस महागात पडली; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, VIDEO बघून डोक्याला हात लावाल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भयंकर वाघ बसलेला आहे आणि त्याच्या गळ्यात लोखंडी साखळी बांधलेली आहे. तिथे दोन लोक देखील उपस्थित होते, जे त्याचे फोटो काढत आहेत. यादरम्यान तिसरा व्यक्ती वाघाला काठीने त्रास देत होता. मग काय, वाघ अस्वस्थ झाला आणि अशा प्रकारे गर्जना केली की दोघेही तिथून पळत सुटले. जीव मुठीत धरून त्यांनी तिथून पळ काढला. आता भविष्यात ते असं काही करण्याआधी दहावेळा विचार करतील.
हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 71 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘बच गए तो भीख मांग कर खा लेंगे, असा विचार करून हे लोक तिथून पळाले’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, वाघही म्हणत असेल, मी तुम्हाला काही केलंच नाही, तुम्ही का पळून गेलात?