3 गाड्यांनी एका मागोमाग चिमुकलीला दिली धडक
नवी दिल्ली, 26 जून : रस्त्यावर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितलं जातं. कारण रस्त्यावर दररोज अनेक अपघात होतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत चालल्याचं पहायला मिळतंय. थोड्याश्या निष्काळजीपणामुळे मोठमोठे अपघात घडतात. अनेक थरारक अपघातांचे व्हिडीओही समोर येत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्याला पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एका चिमुकलीचा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ समोर आलाय. एक चिमुकली रस्त्यावर पळत सुटते. तेवढ्यात तीन गाड्या एका मागोमाग येत तिला धडक देतात. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याने भरधाव वेगाने गाड्या पळत आहेत. तेवढ्यात एक चिमुकली पळत रस्ता ओलांडण्याता प्रयत्न करते. मात्र एक गाडी तिला धडक देते आणि ती खाली कोसळते. लगेच दुसरी गाडी भरधाव वेगाने येत तिला पुन्हा धडकते. तिसरी गाडीही तिच्या जवळून जाते. अशा एकामागोमाग तीन गाड्या चिमुकलीला धडकतात. मात्र चिमुकलीचं नशीब बलवत्तर म्हणून ती एवढ्या भरधाव वेगाच्या गाडीच्या धडकेतून वाचते. तेवढ्यात तिची आई पळत येते आणि तिला उटलून घेते. चिमुकली ठिक असल्याचं दिसतंय.
आईने उचलल्यावर मुलगी रडत असल्याचं दिसत आहे मात्र सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झालेली नाहीये. हा व्हिडीओ @Mystik_33 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 30 सेकंदांचा हा श्वास रोखणारा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. हा संपूर्ण प्रकार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान, अनेकदा पालकांचे लहान मुलांवरील लक्ष इकडे तिकडे झाले तरी ते सैरभैर पळू लागतात. त्यांच्यावरील लक्ष थोडं जरी बाजूला गेलं तरी ते संधी साधत इकडे तिकडे उड्या मारायला लागतात. ज्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबत धक्कादायक घटनाही घडतात. सोशल मीडियावर अशा अपघातांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.