JOIN US
मराठी बातम्या / Viral / रात्री पैंजणाचे आवाज येतात, आपोआप शस्त्रक्रिया होते? 'या' रुग्णालयातील भयानक प्रकार

रात्री पैंजणाचे आवाज येतात, आपोआप शस्त्रक्रिया होते? 'या' रुग्णालयातील भयानक प्रकार

भूत खूप भयानक असतं…अशा अनेक भुताच्या भयंकर संकल्पना असल्या तरी प्रत्यक्षात समोरासमोर भूत बघितलेलं जवळपास कोणीच नसतं.

जाहिरात

रुग्णालय प्रशासनाकडूनच एकदा संध्याकाळ झाली की, रुग्णालयाचे सर्व गेट बंद करून घेतले जातात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 17 जून : कोणी म्हणतं भुताचे पाय उलटे असतात, कोणी म्हणतं भुताची नखं खूप लांब लांब असतात, कोणी म्हणतं भूत पांढऱ्या साडीत दिसतं, कोणी म्हणतं भूत खूप भयानक असतं…या आणि अशा अनेक भुताच्या भयंकर संकल्पना असल्या तरी प्रत्यक्षात समोरासमोर भूत बघितलेलं जवळपास कोणीच नसतं. अशातच लखनऊमधून एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. येथील बलरामपूर या रुग्णालयात भुताटकी असल्याचं म्हटलं जातंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रुग्णालयाचं बांधकाम कब्रस्थानावर झालं आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी याठिकाणी भयंकर किंचाळ्या आणि विचित्र आवाज ऐकू येतात. रुग्णालय प्रशासनाकडूनच एकदा संध्याकाळ झाली की, रुग्णालयाचे सर्व गेट बंद करून घेतले जातात. लोकांना रुग्णालय परिसरात फिरण्यास मनाई केली जाते. रुग्णालयाच्या विविध भागांमध्ये विचित्र सावल्या दिसतात. त्यामुळे या रुग्णालयात एक मंदिरही बांधण्यात आलं आहे. तेव्हापासून भुताटकी जरा कमीप्रमाणात जाणवते मात्र दररोज रात्री पैंजणांचे आवाज येतात, असं स्थानिकांचं मत आहे. तसंच या रुग्णालय परिसरात एक विशाल वटवृक्ष आहे. ज्याखाली मारुतीरायाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मात्र तरीसुद्धा सुनसान रात्री विस्तारलेलं हे झाड अतिशय भयानक दिसतं.

येथील स्थानिक रहिवासी अनिमेष यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी या रुग्णालयात एक रुग्ण रात्रीच्या वेळी दाखल झाला होता. त्याची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र डॉक्टर जाईपर्यंतच त्याची शस्त्रक्रिया आपोआप पूर्ण झाली होती. हे पाहून डॉक्टरही हादरले होते. डॉक्टरांनी रुग्णाला याबाबत विचारलं असता, त्याला काहीच आठवत नव्हतं. या घटनेनंतर बलरामपूर रुग्णालयाला ‘हॉंटेड हाऊस’ असं नाव पडलं. Environment : काजवा महोत्सव काजव्यांच्याच ऱ्हासाचे बनतेय कारण! पाहा काय आहे नेमके कारण दरम्यान, या रुग्णालयात किंवा रुग्णालय परिसरात खरोखर भूत आहे का, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु याठिकाणी यायला लोक प्रचंड घाबरतात. दिवसाढवळ्या रुग्णालयात चांगले उपचार होतात. मात्र संध्याकाळ झाली की, लोक या परिसरात फिरकणंही पसंत करत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या