JOIN US
मराठी बातम्या / Viral / अबब! ही आहे भारतातली सगळ्यात उंच सायकल, 'लिम्का बुक'मध्येही नोंद

अबब! ही आहे भारतातली सगळ्यात उंच सायकल, 'लिम्का बुक'मध्येही नोंद

देशातील सर्वांत उंच म्हणजे (India’s Tallest Bicycle) तब्बल 8 फूट 3 इंचाची सायकल बनवण्याचा विक्रम भारतातील राजीव कुमार (Rajeev Kumar) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Limca Book of Records) त्याची नोंद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल: देशातील सर्वांत उंच म्हणजे (India’s Tallest Bicycle) तब्बल 8 फूट 3 इंचाची सायकल बनवण्याचा विक्रम भारतातील राजीव कुमार (Rajeev Kumar) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Limca Book of Records) त्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ही देशातील सर्वांत उंच फोल्डेबल सायकल (Tallest Foldable Bicycle) आहे. इंजिनीअरिंगचं कोणतंही ज्ञान नसताना राजीव कुमार यांनी ही सायकल स्वतःसाठी तयार केली आहे. चंडीगडमध्ये (Chandigarh) आपल्या या सर्वांत उंच सायकलीसाठी राजीव कुमार उर्फ रॉनी भाई म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते जेव्हा आपली ही तब्बल 8 फुटांपेक्षा उंच सायकल चंडीगडच्या रस्त्यांवर चालवतात तेव्हा बघणारे लोक थक्क होतात आणि त्यांच्याकडून अरे बापरे! ओ माय गॉड! अशा प्रतिक्रिया व्यक्त होतात. सर्वात उंच सायकल तयार करण्याची प्रेरणा राजीव यांना कशी मिळाली आणि ही सायकल तयार करण्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले याबाबतची गोष्टही रंजक आहे. 1995 मध्ये राजीव जेव्हा दहावीत होते तेव्हा वर्गात त्यांची उंची सर्वाधिक होती. त्यामुळं त्यांनी आधी आपल्या सायकलची सीट थोडं उंच केली होती. ही उंच सायकल चालवण्यास त्यांनी सुरुवात केली, तेव्हा त्यांना खूप मजा येत असे. त्यानंतर त्यांची उंची जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्या सायकलची उंचीही वाढली. मग 2013 मध्ये त्यांना सर्वांत उंच सायकल बनवण्याची कल्पना सुचली. मग घरीच वर्कशॉप (Workshop) बनवून त्यांनी ही सायकल बनवण्याचं काम सुरू केलं आणि स्टीलपासून तब्बल 8 फूट 3 इंच उंचीची भली मोठी सायकल बनवली. ही सायकल चालवण्याची एक खास पध्दत असून, ती फक्त राजीव कुमार यांनाच जमते. प्रत्येकाला ती चालवायला जमत नाही.

सर्वात उंच सायकलवरून केला सर्वाधिक मैल प्रवास राजीवकुमार यांनी आतापर्यंत या सायकलवरून चंडीगड ते दिल्ली, चंडीगड ते लुधियाना आणि शिमला ते कालका असा प्रवास केला आहे. भविष्यात चंडीगडहून मुंबईला जाण्याची त्यांची योजना आहे. हा 1667 किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास पूर्ण केला तर सर्वात उंच सायकलवरून सर्वांत लांब अंतराचा प्रवास करण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World records) त्यांच्या नावावर नोंदवला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या