मुंबई 09 मार्च : कार चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. काहींचे व्हिडिओही पाहिले असतील. जालंधर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये चोर एकामागून एक 7 कोटी रुपयांच्या पाच आलिशान कार चोरताना दिसत होते. क्लिप पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. बोल्ट कटरच्या सहाय्याने गेट तोडून सर्व चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि क्षणार्धात या सुपर कार पळवून नेल्या. त्यांचं पुढे काय झालं, हे तर समोर आलं नाही. मात्र आता आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात फक्त 45 सेकंदाच्या आत चोरांनी सहा कार चोरल्याचं पाहायला मिळतं. Video Viral : मुलीला कापण्याची जादू दाखवताना खेळ फसला, घडलं असं काही की सत्य आलं समोर ही घटना अमेरिकेतील Kentucky येथील आहे, ज्याचा व्हिडिओ @DailyLoud नावाच्या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मास्क घातलेले चोर मोठ्या शोरूममध्ये सहज प्रवेश करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. सर्व डॉज चॅलेंजर हेलकॅट स्पोर्ट्स कार तिथे ठेवल्या आहेत. प्रथम ते इकडे तिकडे पाहतात. जेव्हा त्यांना कोणी दिसत नाही तेव्हा ते काही वेळातच गाडीची नंबर प्लेट बदलतात. मग लगेच ड्रायव्हरच्या सीटवर पोहोचतात आणि क्षणार्धात सहा महागड्या गाड्या घेऊन निघून जातात. तिथे कोणीही उपस्थित नव्हतं, मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या शोरूममध्ये चार थरांची सुरक्षा व्यवस्था होती. मात्र चोरट्यांनी तरीही आत प्रवेश करून चोरी केली.
डॉज चॅलेंजर हेलकॅट स्पोर्ट्स कार ही जगातील सर्वात महागडी कार आहे. यूएसमध्ये कारची एक्स-शोरूम किंमत $95,000 आहे, म्हणजे सुमारे 80 लाख रुपये. त्याची क्रेझ एवढी आहे की कंपनी मागणीनुसार तितक्या कारही उपलब्ध करून देऊ शकत नाही. या सर्व गाड्या लोकांनी आठ महिने ते वर्षभरापूर्वी बुक केल्या होत्या. आता त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मात्र त्यापूर्वीच चोरट्यांनी हात साफ केला. सहा पैकी चार गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून लवकरच चोरटे पकडले जातील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र हे लोक कोण आहेत, हे अद्यापही कळू शकलं नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सुमारे 20 हजार लाईक्स मिळाले असून दोन हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे. एवढ्या कमी वेळात त्यांनी किती सहज गाड्या चोरल्या, चोरांची ही पद्धत पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. एकाने पोस्ट केलं, की आम्ही सर्च केलं तेव्हा आम्हाला कळालं, की एक सोडून बाकी सर्वांचा शोध लागला आहे. पहिला चोर 35 मैल दूर दिसला जिथे तो गॅस भरत होता. दुसरा ४५ मैल दूर तर तिसरा ५५ मैल दूर होता. चौथा आणि पाचवा दुसऱ्या राज्यांमध्ये गेला आहे.