जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : मुलीला कापण्याची जादू दाखवताना खेळ फसला, घडलं असं काही की सत्य आलं समोर

Video Viral : मुलीला कापण्याची जादू दाखवताना खेळ फसला, घडलं असं काही की सत्य आलं समोर

व्हायरल

व्हायरल

जत्रा, सर्कस अशा अनेक ठिकाणी आपण जादूगाराचे शो लागलेले पाहतो. हटके, विचित्र, भितीदायक जादू करत ते लोकाचं मनोरंजन करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मार्च : जत्रा, सर्कस अशा अनेक ठिकाणी आपण जादूगाराचे शो लागलेले पाहतो. हटके, विचित्र, भितीदायक जादू करत ते लोकाचं मनोरंजन करतात. ते त्यांच्या कलेमध्ये एवढे निपुण असतात की आपल्या डोळ्यांसमोर ते सहज ‘हातांची सफाई’ करतात. काही सेकंदांच्या जादूमध्ये जादूगार आपल्याला आश्चर्यचकित करतो. मात्र कधी कधी त्याची जादू चुकिची पण होऊन जाते. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. एका व्यक्तीने जादूगाराची पोलखोल केली. सध्या जादूचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. जादूचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. या व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि विचार आला असेल की या जादूगाराने ही जादू कशी केली असेल. मात्र पुढे जाऊन जादूगाराची चांगलीच फजिती झाली आणि जादूची ट्रिक सर्वांनाच माहिती झाली.

जाहिरात

व्हिडिओमध्ये शरीर अर्धे कापलेले दिसत आहे. स्कर्ट घातलेल्या महिलेचे फक्त पाय हलताना दिसत आहेत. ज्यांना जादू दिसते त्यांना स्त्रीच्या शरीराचा अर्धा भागच दिसतो, तर शरीराचा अर्धा भाग गायब असल्याचे दिसून येते. हे संपूर्ण दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साह काहीवेळासाठी वाढला. त्या महिलेचे पाय खरे आहेत आणि ती जिवंत आहे हे दाखवण्यासाठी जादूगारही टेबल इकडे-तिकडे हलवतो. हे दृश्य पाहून तुम्हालाही थोडा वेळ आश्चर्य वाटेल, पण तेव्हाच एक व्यक्ती येतो आणि टेबल सरकवतो. त्या व्यक्तीमुळे जादूगाराचे भांडे फुटते.

News18लोकमत
News18लोकमत

सत्य समोर आल्यावर दिसते की अर्ध शरीर दिसत असलेली महिला नसून माणूस आहे ज्याने सॉक्स घातले आहेत. आणि तो टेबलखाली वाकून थांबला असतो. मात्र काही वेळात जादूगाराची ट्रिक उघड होते. हा मजेशी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात