JOIN US
मराठी बातम्या / Viral / रेल्वे स्टेशन जवळ येताच तुम्हीही ट्रेनच्या दरवाजात उभे राहता? मग हा भयंकर VIRAL VIDEO एकदा पाहाच

रेल्वे स्टेशन जवळ येताच तुम्हीही ट्रेनच्या दरवाजात उभे राहता? मग हा भयंकर VIRAL VIDEO एकदा पाहाच

चालत्या ट्रेनचा हा धक्कादायक असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

ट्रेनच्या दरवाजात उभे राहताना सावधान!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जून : ट्रेनने प्रवास करताना स्टेशन जवळ आलं की आपण ट्रेनच्या दरवाजात जाऊन उभं राहतो. तसं हे आपल्यासाठी सामान्य पण हीच सवय भयंकर ठरू शकते. ट्रेन ने प्रवास करताना रेल्वे स्टेशन येण्याआधी दरवाजात उभं राहणं किती भयानक ठरू शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधी ट्रेनच्या दरवाजात स्टेशन येण्याआधीच उभे राहणार नाही. रेल्वे प्रवासाचा हा धक्कादायक असा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धडकी भरली आहे. रात्रीचं दृश्य आहे. एक महिला आणि पुरुष ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे आहेत. महिलेसोबत जे घडतं ते पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे धक्कादायक दृश्य कैद झालं आहे. Video Viral: गाडी चालवताना खतरनाक स्टंट; सीटवर झोपला दुचाकीस्वार, पण पुढच्याच क्षणी भीषण अपघात व्हिडीओत तुम्ही पाहाल तर महिला एका पुरुषासोबत ट्रेनच्या दरवाजात उभी आहे. काही वेळातच स्टेशन येणार आहे. आपलं सर्व सामान वगैरे घेऊन  स्टेशनवर उतरण्याच्या तयारीत हे लोक आहे. काही वेळाने ट्रेनचा वेग कमी होतो. हीच संधी साधत एक व्यक्ती ट्रेनच्या बाहेरून धावत येतो आणि चालत्या ट्रेनमध्ये चढतो. तो थेट महिलेला खेचू लागतो. महिलेच्या हातातील पर्स खेचण्याचा तो प्रयत्न करतो. महिला आपली पर्स वाचवण्याचा खूप प्रयत्न करते पण अखेर ती व्यक्ती पर्स खेचून चालत्या ट्रेनमधून बारहेस उडी मारते. ती त्या व्यक्तीच्या मागे जाते. पण तिच्यासोबत असेलला पुरुष तिला थांहवतो. नाहीतर ती ट्रेनमधून खाली पडली असती आणि पर्ससाठी तिने आपला अनमोल जीव गमावला असता. Indian Railways: रेल्वे स्टेशनच्या मागे लिहिलेलं असतं टर्मिनल, सेंट्रल आणि जंक्शन! पण याचा अर्थ काय? चालत्या ट्रेनच्या दारात घडलेली अशी घटना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी अशी चूक पुन्हा करणार नाही अशी शपथ घेतली.

संबंधित बातम्या

@gk_questions_ncert इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आता काय करणार? चालत्या ट्रेनच्या दारात पुन्हा उभं राहण्याची हिंमत तुमची होईल का? ते आम्हाला आमच्या सोशल मडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या