JOIN US
मराठी बातम्या / Viral / गायिकेने असा छेडला सूर, कुत्रा-मांजरांपासून माणसांची झाली अशी अवस्था; रेहमानने शेअर केला मजेशीर VIDEO

गायिकेने असा छेडला सूर, कुत्रा-मांजरांपासून माणसांची झाली अशी अवस्था; रेहमानने शेअर केला मजेशीर VIDEO

हा व्हिडीओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जानेवारी : संगीत दिग्दर्शक आणि गायक ए आर रेहमान (A R Rahman) आपल्या गाण्यांच्या जोरावर जगात एक जागा निर्माण केली आहे. आपल्या दर्जेदाज गाण्यासाठी रेहमानला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. (A R Rahman Instagram) ए आर रेहमान सोशल मीडियावरदेखील बरेच सक्रिय असतात. ते नियमित फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पटाखा गुड्डी (Patakha Guddi)’ गाण्याची गायिका ज्योति नूरां (Jyoti Nooran) दिसत आहे. ती असा सुर लावते, असा सुर लावते की ज्यानंतर कुत्रा-मांजरांपासून अगदी माणसंदेखील पळायला लागतात.

या व्हिडीओत ज्योति नूरां (Jyoti Nooran Songh) वरचा सूर लावते. हा व्हिडीओ एडिटिड आहे. हा व्हिडीओ शेअऱ करीत रेहमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे कोणी एडिट केलं? रेहमानने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ए आर रेहमान (AR Rahman) याने आपल्या जिवनाविषयी म्हणतो की, मी माझं आयुष्य स्वत: हँडल करू शकत नाही. हे नशीब आहे. लोकांचं कौतुक करू किंवा मग असं म्हणूया की ते मला पसंत करतात. ज्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या