'तो' क्षण येताच एक घोटाळा झाला आणि नवरीला पहिली रात्र एकटीनेच जागावी लागली.
संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा, 28 जून : रात्रीच्या निवांत शांततेत सनई-चौघडे वाजले, लग्न लागलं. वधूपक्षाने वरपक्षाचा मानपान केला. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू अशी काहीशी नवरीची स्थिती होती. आनंदात तिची पाठवणी झाली. सासरीही छान विधिवत स्वागत झालं. आता वेळ आली पहिल्या रात्रीची, नवरा-नवरी आतुरतेने वाट पाहत होते त्या क्षणाची. मात्र तो क्षण येताच एक घोटाळा झाला आणि नवरीला पहिली रात्र एकटीनेच जागावी लागली. बिहारच्या छपरा जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी बायकोसाठी खास मिठाई आणायला जातोय असं सांगून नवरदेव बाहेर पडला तो घरी परतलाच नाही. हुंड्यात मिळालेली बाईक घेऊन तो गेला होता. घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी आजूबाजूला चौकशी केली, नातेवाईकांनाही फोन गेले. मात्र तो काही सापडला नाही. आता याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली असून नवरदेवाच्या जीवाला काही धोका तर नसेल ना, या विचाराने कुटुंबीयांची धाकधूक वाढली आहे. तर, नवरा मिठाईच्या रूपात बायकोसाठी सवत घेऊन येणार नाही ना, असे तर्कवितर्कही लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भोरहा गावचे निवासी दिनेश महतो यांच्या 24 वर्षीय मुलाचं नेथुआ गावचे निवासी काशी महतो यांच्या मुलीशी 25 जून रोजी लग्न झालं. जियालालने ज्योती कुमारीशी लग्नगाठ बांधली. 26 जून रोजी सकाळी त्यांची वरात जियालालच्या घरी पोहोचली. वरातीनंतर गृहप्रवेशाचे सर्व विधी सुरळीत पार पडले. लाल इश्क! भरजरी पैठणी अन् भांगात भरलं कुंकू; इंडस्ट्रीतील कपल झालं भलतंच रोमँटिक त्याच दिवशी संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास जियालाल मिठाई आणण्यासाठी घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या क्वार्टर बाजारात हुंड्यात मिळालेली बाईक घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. नवरीच्या जीवाची नुसती घालमेल सुरू होती. घरचेही चिंतेत होती. नवरीच्या माहेरीदेखील याबाबत कळलं. ते आणि जियालालचे इतर नातेवाईक तातडीने त्याच्या घरी दाखल झाले. रात्रभर शोधाशोध केली, परंतु जियालाल कुठे सापडला नाही. त्याची बाईकही दिसली नाही. अखेर जियालालच्या वडिलांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे, त्यांनाही अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. दरम्यान, नातेवाईकांमध्ये जियालालबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.