डान्स प्रॅक्टिस करतानाचा Shocking Video
नवी दिल्ली, 26 मे : अनेक लोकांना डान्स करण्याचा छंद असतो. जगभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स पद्धती आहेत. निरनिराळे डान्स करताना सोशल मीडियावर अनेकांचे व्हिडीओ समोर येत असतात. यादरम्यान झालेली फजितीही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये चीअर्सलीडर्सला हवेत फेकल्यावर तिच्यासोबत धक्कादाक घडतं. चीअर्सलीडर अनेकदा आपल्या डान्सने मैदानातील खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. मात्र कधी कधी त्यांना चिअर्स करण्यावेळी त्यांना प्रोत्साहन देताना काहीतरी विचित्र घडतं. यासाठी अनेक प्रॅक्टिस करुनही कधी कधी नशीब त्यांची साथ देत नाही.
सध्या समोर आलेला व्हिडीओ मैदातान डान्स करणाऱ्या चिअर्सलिडरचा आहे. सरावादरम्यान तरुणीसोबत खूप भयानक घडतं. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चीअरलीडरला तिच्या कंबरेला धरून तिला हवेत फेकून स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादरम्यान तो चीअरलीडरला हवेत फेकून त्याच्या हातावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, एका छोट्याशा चुकीमुळे, चीअरलीडर त्याच्या हातातून निसटते आणि तोंडावर जमिनीवर पडते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चिअर्स लीडर खूप वाईटरित्या जमिनीवर पडते. काही क्षणासाठी काळजाचा एक ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. @1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 7 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ कमेंट आणि लाईक्सही येताना दिसत आहे. दरम्यान, सरावावेळीही अशा घटना खूप घडतात. तरीही ते लोक हार न मानता पुन्हा नव्याने उठतात आणि प्रयत्न करतात.