आगीशी खेळ महागात.
हैदराबाद, 20 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social media) स्टंटचे (Stunt) बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. खतरनाक स्टंट (Stunt video) पाहून आपल्याला धडकीच भरते. हे स्टंट करताना थोडीशी जरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं (Stunt gone wrong). स्टंटमुळे जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) घडली आहे. आगीशी खेळताना (Fire Stunt) कराटे मास्टरचा (Karate master) मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या पदुकोट्टाई (Pudukottai) जिल्ह्यातील एका मैदानात कराटे स्टंट दाखवले जात होते. यावेळी कराटे मास्टर फायर स्टंट करत होता. बालाजी (Balajai) असं या कराटे मास्टरचं नाव आहे.
अचानक मोठा वारा आला, त्यामुळे आग भडकली. आगीने रौद्र रूप धारण केलं आणि खेळ जीवावर बेतला. आगीशी खेळणाऱ्या बालाजीला आगीने आपल्या विळख्यात घेतलं. हे वाचा - खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि…; पाहा थरारक VIDEO आगीत पेटणाऱ्या बालाजीला पाहून सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जीवनमृत्यूशी त्याची झुंज सुरू होती. उपचारांना तो प्रतिसादही देत नव्हता. पण अखेर त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.