स्टंट व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. शिवाय येथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण मंडळी स्टंटबाजी करत असतात. फक्त काही व्ह्यूज किंवा आपण किती डेरिंगबाज आहोत, हे दाखवण्यासाठी हे तरुण आपल्या प्राणांची देखील पर्वा करत नाहीत. रस्त्यावर स्टंट करण्याचे देखील तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही तरुण मंडळी बाईकवरुन रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे. हा स्टंट खरंच खूपच धोकादायक आहे. दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद वास्तविक, हा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला, ज्यानंतर तो जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठला आहे याची पुष्टी झालेली नाही. वर्दळीच्या रस्त्यावर तीन मुले दुचाकीवरून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आधीच तिघांनी गाडीवर बसून वाहतुकीचे नियम मोडले आहेत. शिवाय त्यांनी व्हिली देखील मारली आहे. म्हणजेच या तरुणांनी आपल्या गाडीचं पुढचं चाक उचलून आपली गाडी उचलली आणि खूप जास्त वेगाने ते गाडी चालवत आहेत.
त्यांनी हवेत गाडीचे पुढचे चाक उचलले आणि फक्त मागच्या चाकाच्या मदतीने ते रस्त्यावर धावत आहे. एका बाजूला तो मुलगा ही बाईक चालवत आहे तर दुसरीकडे अनेक वाहने रस्त्यावरून ये-जा करत आहेत. तो इतर दोन मित्रांसोबत बाईकवरुन जाताना दिसत आहेत. एका बाजूला हे मुलं अशी स्टंटबाजी करत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यावर अनेक गाड्यांची वरदळ आहे. या मुलांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा स्वत:चा जीव तर धोक्यात त्यांनी टाकला पण त्यांच्या चुकीमुळे इतरांच्या जिवाला देखील धोका आहे.
या तरुणांचं नशीब चांगलं होतं की त्यांच्यासोबत काही अपघात घडला नाही. पण म्हणून विषयाची परीक्षा घेणे चांगलं नाही. कारण असा धोकादायक स्टंट तुमच्या जीवावर उठू शकतो.