JOIN US
मराठी बातम्या / Viral / Street Romance: चालत्या स्कूटीवर मुलांचा कारनामा; चक्क किस करताना Video Viral

Street Romance: चालत्या स्कूटीवर मुलांचा कारनामा; चक्क किस करताना Video Viral

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळतात.

जाहिरात

चालत्या स्कूटीवर मुलांचा कारनामा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 जून : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळतात. गेल्या काही काळापासून तर तरुण तरुणींचे रोमॅंन्टिक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत. रेल्वेमध्ये, विमानात, बसमध्ये, रस्त्यावर तरुण तरुणींचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतोय. नुकताच असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. जो पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन मुले स्कूटीवर बसलेली आहेत. यासोबतच मागे बसलेली दोन मुलं एकमेकांना किस करत आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दोन मुलांचा रस्त्यावर खुलेआम किस करताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका स्कूटीवर तीन जण बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी हेल्मेटही घातलेले नाही आणि ते रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसत आहे. स्कूटीचा नंबर उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा आहे. मात्र ही घटना नेमकी कुठे घडली आहे याविषयी स्पष्टता नाहीये.

संबंधित बातम्या

दरम्यान, तरुणांचे असे व्हिडीओ समोर येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भरगर्दीतही तरुणाई असे कृत्य करताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक यावर संताप व्यक्त करतात. यापूर्वीही असे बरेचसे व्हिडीओ समोर आलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या