आत्तापर्यंत मानवी शरीरात सापडल्या आहेत `या` विचित्र गोष्टी
मुंबई, 11 मे : बऱ्याचदा आपण अशा काही विचित्र घटना ऐकतो, पाहतो ज्यावर सहजासहजी विश्वास बसणं कठीण असतं. शरीराच्या एखाद्या अवयवात कीडे, अळ्या, वस्तू किंवा एखादा पदार्थ अडकून बसणं ही घटना अशाच विचित्र घटनांपैकी एक होय. खरं तर या गोष्टी शरीरातून बाहेर काढणं डॉक्टरांसाठीही आव्हान ठरत असतं. जगभरात घडलेल्या आणि चर्चेत आलेल्या अशा काही घटनांविषयी सविस्तर जाणून घेऊया. भारतातील एका 20 वर्षाच्या व्यक्तीला छातीच्या पोकळीत संसर्ग झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असता, डॉक्टरांना त्याच्या शरीरात बेल्ट अर्थात कंबरेचा पट्टा आढळून आला. डॉक्टरांनी तो काढून टाकून रुग्णाला जीवदान दिलं. एका आठ वर्षांच्या मुलीला पोटात दुखत असल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. तिचा एक्स-रे काढला असता तिच्या पोटात अनेक बॅटरी आणि चुंबक असल्याचं दिसलं. प्रॅक्स सांचेझ या व्यक्तीच्या कानात तीव्र वेदना होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला. त्याचा एमआरआय करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळा त्याला खोकला आला आणि त्याच्या नाकातून एक इंचाचा खिळा बाहेर आला. सिल्वी डुबे नावाच्या महिलेवर हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया झाली. पण तिच्या ओटीपोटीत वेदना होत असल्याने डॉक्टरांनी एक्स-रे काढला. त्यावेळी शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटात 12 इंचाची वैद्यकीय उपकरणं राहिल्याचं दिसून आलं होतं. हेही वाचा - टक्कल असलेल्यांना करावा लागतो या भेदभावांचा सामना, सर्व्हेमधून झाले काही खुलासे कोलोरॅडोतील अॅरॉन डॅलस नावाची व्यक्ती बेलीझला सहलीला गेली. तिथून परतल्यावर त्याच्या टाळूवर काहीतरी असल्याचं त्याला जाणवलं. रुग्णालयात गेला असता त्याच्या टाळूतून पाच अळ्या बाहेर काढण्यात आल्या. चिनी डॉक्टरांना 18 महिन्यांच्या बाळाच्या कानात एक रानटी फुलझाड असल्याचं दिसलं. हे रोप कानात सुमारे एक इंचापर्यंत वाढलं होतं.
कझाकिस्तानमधील एक तरुण कानदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेला. त्यांनी त्याच्या कानातून 12 अळ्या बाहेर काढल्या. एका 63 वर्षांच्या महिलेने कालमारी हा सागरी प्राणी खाल्ला. त्यानंतर तिच्या हिरड्या आणि दात फुगले. ती डॉक्टरांकडे गेली असता त्यांना तिच्या तोंडात 12 सेफॅलोपॉड्सची पिलं वाढत असल्याचं दिसलं. एका 60 वर्षांच्या व्यक्तीच्या कानात झुरळ गेलं. त्याने झुरळ काढण्याचा प्रयत्न केला. कानात कीटकनाशक फवारलं. पण यामुळे त्याचा कान सुजला, संसर्ग झाला अखेरीस डॉक्टरांनी सर्जरी करून मृत झुरळ बाहेर काढलं. हेही वाचा - जबरा फॅन! फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्ष पाहिलं आणि स्वतःचे ‘डोळे’ विकायला काढले; अजब कारण होंडुरासमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाच्या डोळ्यात डासाने अंडी घातली. त्यामुळे या मुलाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डासाची अंडी काढण्यात आली. डोळ्यांची दृष्टी कमी झाल्याने जॉन मॅथ्यूज नावाची व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासलं असता त्याच्या डोळ्यात जंत असल्याचं दिसलं. एका चिनी महिलेच्या कानात खूप खाज सुटू लागली. ती रुग्णालयात गेली. तपासणी केली असता डॉक्टरांना तिच्या कानात कोळी आढळून आला. एका व्यक्तीच्या अॅपेन्डोक्टोमीच्या जखमेतून एक कोळी त्याच्या पोटापर्यंत पोहोचला. शस्त्रक्रिया करून हा कोळी काढण्यात आला. हाना फोल्डिनोव्हा नावाच्या 76 वर्षीय महिलेच्या किडनीत चार इंच लांब परजीवी असल्याचं डॉक्टरांना दिसलं. शस्त्रक्रिया करून हा परजीवी काढण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांना तिच्या मूत्राशयात आणखी एक दोन इंचाचा परजीवी आढळला होता. भारतातील एक तरुण नदीत पोहत असताना अचानक त्याच्या नाकातून एक मासा त्याच्या फुफ्फुसात गेला. डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करून मासा काढून टाकला. 14 वर्षांचा भारतीय मुलगा मस्त्यालयाची सफाई करत होता. तो बाथरुममध्ये गेला असता एक मासा त्याच्या मूत्रमार्गात गेला. डॉक्टरांनी तो काढून टाकला. आर्टिओम सिडोरकिन नावाच्या व्यक्तीला छातीत वेदना जाणवत होत्या. तो रुग्णालयात गेला असता, तपासणी दरम्यान त्याच्या फुफ्फुसात एक लहान फर वनस्पती वाढत असल्याचे दिसले होते. एका किशोरवयीन मुलीच्या पोटात चार किलोचा केसांचा गोळा असल्याचे डॉक्टरांना दिसले. तिला ट्रायकोफॅगिया हा आजार होता. त्यामुळे ती काहीही पिऊ शकत नव्हती.