प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
अॅमस्टरडॅम, 29 एप्रिल : जसं आई होणं कित्येक महिलांना वाटतं, तसंच पुरुषांनाही बाबा होण्याची इच्छा असते. महिलांप्रमाणे पुरुषांच्या आयुष्यात यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. पण असा पुरुष ज्याला कोर्टाने बाबा होण्यास बंदी घातली आहे. मूल झालं तर त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. कोर्टाने हा अजब निर्णय दिला आहे. यामागील कारणही तितकंच धक्कादायक आहे.
आता तुम्ही म्हणाल कोर्ट कुणाला बाबा होण्यावर बंदी का घालेल? हे प्रकरण आहे नेदरलँडमधील. जॉनथन मेयर असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्याला बाप होण्यावर कोर्टाने बंदी घातली. त्याचा प्रताप पाहून कोर्टही चक्रावलं. त्यामुळे त्याच्याबाबत कोर्टाने असा विचित्र निर्णय दिला. हेग जिल्हा कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली.
41 वर्षांचा जॉनथन आधीच बाप झालेला आहे. त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 550 मुलं आहेत. देशातील नियमानुसार कोणताही पुरुष 12 महिलांपासून 25 मुलांचा वडील बनू शकतो. त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला घालता येत नाही. पण जॉनथनने या नियमाचं उल्लंघन केलं. Please, असा Teddy Bear असेल तर …; एका लेकीच्या बाबाने केली कळकळीची विनंती तो एक स्पर्म डोनर आहे. नेदरलँडमधील कित्येक क्लिनिकमध्ये त्याने आपले स्पर्म डोनेट केले आहेत. स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून त्याने भरपूर पैसे कमवले आहेत. डच सोसाइटी ऑफ ऑब्सटेट्रिक्स अँड गायनोकोलॉजीने 2017 साली पहिल्यांदा जॉनथनबाबत सांगितलं होतं. तेव्हा तो नेदरलँडच्या 10 क्लिनिकमध्ये स्पर्म डोनेट करून 102 मुलांचा बाप बनला होता. त्याला त्याच्या देशात ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं, त्यामुळे तो परदेशात स्पर्म डोनेट करू लागला. कित्येक डच फर्टिलिटी क्लिनिक्स, डेन्मार्कच्या क्लिनिकशी आणि लोकांशी ऑनलाइन संपर्क करून त्याने आपले स्पर्म विकले. जॉनथनने आपल्या क्लाइंट्सना स्पर्म डोनेशनबाबत खोटी माहिती दिल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. तर जॉनथनच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं, जे कपल कधी आई-वडील बनू शकत नाहीत, तो फक्त त्यांची मदत करत होता. ‘डॅड ऑफ द इअर’, लेकींच्या सुरक्षेसाठी बाबाने केलं असं काही की तुफान VIRAL होतोय VIDEO दरम्यान आता त्याला स्पर्म डोनेट करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. ज्यामुळे तो स्पर्म डोनेट करू शकत नाही. जर त्याने असं केलं तर त्याला 90 लाख रुपये दंड भरावा लागेल.