नवी दिल्ली 03 मार्च : तुम्ही आतापर्यंत सोडवलेली कोडी बहुतेकदा तुमच्या नजरेची चाचणी घेतात आणि तुम्हाला समोरच्या दृश्यातील काही वस्तू शोधण्याचं आव्हान देतात. अशा कोड्यांचा उद्देश तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेणं हा असतो. अनेक वेळा कोडं गणित किंवा इंग्रजी अक्षरांशी संबंधित असतात आणि तुमच्या तार्किक बुद्धिमत्तेचीही चाचणी घेतली जाते. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी आणलेलं कोडं या सर्वांपेक्षा थोडं वेगळं आहे. जगात ही फक्त एकटीच अशी कोंबडी, शोधूनही कुठे सापडणार नाही; असं तिच्यात काय खास पाहा खरतर हे कोडं फोटोमधील काही शोधायचं नसून इथे तुम्हाला डिटेक्टीव्ह अँगलनं तुमचं डोकं चालवायचं आहे. वेळ कमी आहे आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टास्क आहे. जर तुम्ही ते पूर्ण करू शकत असाल तर कमी वेळात गोष्टी सोडवण्यात तुम्ही माहीर आहात, असं म्हणता येईल. आता हे कोडं पाहूया, जे तुमचं डिटेक्टिव्ह स्किल तपासेल.
हे कोडं Bright Side वरून घेतलं आहे. यात तुम्हाला दोन सीन्स पाहायला मिळतात. एक दृश्य ऑफिसचं आहे, जिथे एक पोलीस अधिकारी उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला एक कर्मचारी उभा आहे. दोघेही एकत्र ऑफिसच्या फरशीवर केलेल्या पावलांचे ठसे बघत आहेत. या खुणा त्याच चोराच्या पादुका आहेत, ज्याने कार्यालयात चोरी करून गोंधळ घातला. छायाचित्रासोबतच आम्ही तुम्हाला आणखी तीन जणांचा फोटोही देत आहोत, जे या चोरीचे संशयित आहेत. तुम्हाला चपलांचे ठसे पाहून सांगावं लागेल, की यातील नेमकं कोणी ऑफिसमध्ये चोरी केली.
यात दडला आहे एक अनमोल विचार! गाडीवरील प्लेटवर काय लिहिलंय तुम्ही सांगू शकता का? तीन कर्मचाऱ्यांपैकी एक आहे, जो पोलीस अधिकाऱ्यांशी खोटं बोलत आहे. तुम्हाला 7 सेकंदात गुन्ह्याचे दृश्य आणि समोर उभे असलेले तीन लोक पाहावे लागतील. मग यापैकी फरशीवरील बुटाचे चिन्ह कोणाचे असू शकतात ते सांगायचं आहे. परंतु आणखी एक बाब अशी, की यापैकी एक शू प्रिंट स्वतः बिजनेसमॅनचं आहे. कॉर्पोरेट लूकमधला उद्योगपती फॉर्मल शूज घालत असल्याने स्पोर्ट्स शूजमधला व्यक्ती चोर आहे. चित्रात दोन मुली आहेत आणि फक्त एका व्यक्तीने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. अशावेळी तोच चोर आहे, हे स्पष्ट होतं.