JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे बाप! केसात लपून बसला साप, तरुणाने डोक्याला हात लावला अन्...; Shocking Video Viral

बापरे बाप! केसात लपून बसला साप, तरुणाने डोक्याला हात लावला अन्...; Shocking Video Viral

केसात लपून राहिलेल्या या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

केसात साप (फोटो - इ्न्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जून :  सापाचे तुम्ही आजवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी बाईक, कधी कार, कधी चप्पल, कधी सोफा, कधी किचन अशा किती तरी ठिकाणी साप लपून बसल्याची प्रकरण समोर आली आहेत. पण आता तर चक्क एका व्यक्तीच्या केसांतच साप लपून बसला होता. व्यक्तीने डोक्याला हात लावताच जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. साप म्हटलं तरी घाम फुटतो. साप समोर दिसला तर तोंडाची बोबडीच वळते. विचार हाच साप तुमच्या शरीरावर असेल तर… तेसुद्धा केसात… कल्पना करूनच अंगावर काटा आला की नाही. पण प्रत्यक्षात असं एका व्यक्तीसोबत घडलं. त्याच्या केसात चक्क साप लपून बसला होता. धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीचे केस कुरळे होते आणि या कुरळ्या केसात हा साप अडकला होता.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता व्यक्तीच्या कुरळ्या केसात साप चालताना दिसतो आहे. केसांमध्ये तो गुरफटला आहे. व्यक्ती हातानेच त्या सापाला आपल्या केसांमधून खेचण्याचा प्रयत्न करतो. पण जसा तो हात लावतो, तसा साप त्याच्या हातातून निसटतो आहे. तो त्याच्या हातात काही येत नाही आहे. उलट तो केसांमध्ये अधिक गुंतत जातो आहे. Shocking Video! 2 तुकडे झाले तरी साप जिवंत, धडावेगळ्या झालेल्या तोंडाने स्वतःचंच शरीर खाल्लं आता या तरुणाच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुमची काय अवस्था झाली असती… तुमचा निम्मा जीवच गेला असता नाही का? पण या व्हिडीओतील तरुणाच्या बाबतीच मात्र तसं काहीच नाही. त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसत नाही आहे. सापही त्याच्या केसात फिरण्याशिवाय त्याला काहीच करत नाही आहे. कदाचित हा त्याचा पाळीव साप असावा. लोकांनी साप पाळल्याचेही असे काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. तो, ती आणि साप! आयुष्यात कधीच पाहिली नसेल अशी अनोखी LOVE STORY @devin_allen21 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

साप तसा छोटा आहे. पण तरी तो डोक्यात… तुम्ही या व्यक्तीच्या जागी असता तर तुमचं काय झालं असतं, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंटमध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या