JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : तिनं पहिल्यांदा आइस्क्रिम खाल्लं आणि सुरु झाला 'हॅपी डान्स', क्यूट रिएक्शनची सर्वांना भुरळ

Video : तिनं पहिल्यांदा आइस्क्रिम खाल्लं आणि सुरु झाला 'हॅपी डान्स', क्यूट रिएक्शनची सर्वांना भुरळ

जेव्हा ही मुलं पहिल्यांना चॉकलेट किंवा आइस्क्रीम टेस्ट करतात, तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असते हे तुम्ही कधी पाहिलंय का?

जाहिरात

क्युट व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : लहान मुलं ही फारच निरागस असतात. त्यांचे कधी हावभाव तर कधी त्यांचे शब्द ऐकायला फारच भारी वाटतं. सोशल मीडियावर त्यांच्यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक क्यूट व्हिडीओ समोर आला आहे जो एका चिमुकलीचा आहे. हा व्हिडीओ आणि चिमुकलीची रिएक्शन तुमचा नक्कीच मुड बदलेल. चॉकलेट, आइस्क्रीमपासून मुलांना दूर ठेवणे हे कोणत्याही पालकांसाठी सोपे काम नाही. विशेष म्हणजे गोड गोष्टी मुलांना फारच आवडतात. पण जेव्हा ही मुलं पहिल्यांना चॉकलेट किंवा आइस्क्रीम टेस्ट करतात, तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असते हे तुम्ही कधी पाहिलंय का? Viral Video : “पाचमधून पाच वजा केले तर किती उरले?” या खोडकर मुलाचं उत्तर ऐकाल तर पोट धरुन हसाल हा व्हायरल क्यूट व्हिडीओ याच गोष्टीशी संबंधीत आहे. या व्हिडीओमधील चिमुकली पहिल्यांदा आइस्क्रीमची चव घेत आहे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे एक्स्प्रेशन येतात, ते खरोखरंच पाहाण्यासारखे असतात. खरंतर एका आईने आपल्या मुलीची पहिल्यांदा आइस्क्रीम खाताना कशी रिएक्शन आहे, हे पाहाण्यासाठी हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. जे तिने सोशल मीडियावर देखील शेअर केलं आहे व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुरुवातीला या मुलीनं आईस्क्रीमला पहिल्यांदा चाखलं. तेव्हा ती थोडी कन्फ्यूज होती, मग ती पुन्हा काळजीपूर्वक आइस्क्रीम चाटते. तेव्हा तिला आइस्क्रीमची ही टेस्ट आवडते आणि खूप गोड अशी रिएक्शन देते.

संबंधित बातम्या

काही सेकंदाचा हा व्हिडीओ खूपच क्यूट आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ‘होम ऑफ बेबी’ नावाच्या सोशल मीडिया हँडलसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओवर अनेक युझर्सनी कमेंट्सही केल्या आहेत. ‘कितने मगरमच्छ थें?’ एक कोंबडा आणि डजनभर मगरी, ‘ये तो ना इन्साफी है’… मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच एका युझरने लिहिले की, “ज्या प्रकारे बाळाला आइस्क्रीम टेस्ट करण्यासाठी वेळ लागला ते मला आवडले. आणखी एका युझरने लिहिले, “यम्मी! . आणखी एका युझरने लिहिले की, ‘हॅपी डान्स. ’ पण काही युजर्सने यावर टीका देखील केली आहे. लहान मुलांना असं आइस्क्रीम देणं चुकीचं असल्याचं देखील काही लोकांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या