JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाबो! साधासुधा नाही हा रेडा, याच्यासमोर लक्झरी गाड्याही फेल; खासियत अशी की तोंडात बोटं घालाल

बाबो! साधासुधा नाही हा रेडा, याच्यासमोर लक्झरी गाड्याही फेल; खासियत अशी की तोंडात बोटं घालाल

या रेड्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, देशभर त्याची चर्चा होते आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 08 एप्रिल : देशभरात सध्या एक रेडा चांगलाच चर्चेत आला आहे. या रेड्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हा रेडा साधासुधा नाही तर खूप खास आहे. या रेड्यासमोर महागड्या आलिशान गाड्याही फेल आहे. लक्झरी गाड्या याच्यासमोर काहीच नाही. या रेड्याचं वैशिष्ट्य वाचाल तर थक्क व्हाल. त्याची खासियत अशी आहे की प्रत्येक जण तोंडात बोटं घालेल. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर कृषी प्रदर्शन आणि पशू मेळावा झाला. या मेळाव्यात वेगेवगेळ्या राज्यातील अनेक प्राण्यांना आणण्यात आलं. पण या रेड्याचीच चर्चा इथं होत होती. या रेड्याचं नाव नाव शूरवीर असं आहे. मुर्राह प्रजातीचा हा रेडा आहे. या रेड्यामुळे त्याचा माल लाखो रुपये जिंकला आहे. मेळ्यात त्याला तब्बल 7.5 लाख रुपये देण्यात आले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.संजीव बल्यान, कौशल्य विकास राज्यमंत्री कपिलदेव अग्रवाल, जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉ. वीरपाल निर्वाल यांनी त्यांचा गौरव केला. प्रोत्साहनपर रकमेसह त्यांना ट्रॉफीही देण्यात आली. VIDEO - या प्राण्यासमोर जंगलाच्या राजाचाही हवा टाईट; पाहताच सिंहांनी ठोकली धूम गेल्या शुक्रवारी मेरठ रोडच्या मैदानावर विविध राज्यातील प्राण्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये मुर्राह जातीचा हा शूरवीर रेडा विजेता ठरला आहे.  या रेड्याला राष्ट्रीय विजेते घोषित करण्यात आलं. शूरवीर चॅम्पियन घोषित होताच सोशल मीडियावरही तो लोकप्रिय झाला. जत्रेत त्याच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढणाऱ्यांची गर्दी होती. मिळालेल्या माहितीनुसार हा रेडा आतापर्यंत 10 वेळा चॅम्पियन ठरला आहे. या रेड्याचं वय अवघे 4 वर्षे आहे. त्याची उंची 5 फूट 7 इंच, तर लांबी 10 फूट असल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल या रेड्याची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे. आश्चर्य! ज्या श्वानाची शिकार करायला आला बिबट्या, त्याचाच वाचवला जीव; पण का? पाहा VIDEO टीव्ही 9 हिंदीच्या  वृत्ता नुसार हा रेडा युवराज नावाच्या प्रसिद्ध रेड्याचा भाऊ आहे. त्याचं आईचं नाव गंगा आणि वडिलांचं नाव योगराज आहे. हे तिघेही त्यांच्या काळातील विजेते आहेत आणि त्यांनी देशभरातील प्राणी मेळाव्यांमध्ये नाव कमवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या