धोकादायक व्हिडीओ
मुंबई, 24 जून : आपल्याला टेक्नॉलॉजीवर अवलंबून रहाण्याची इतकी सवय झाली आहे की आपण त्याच्या शिवाय आपल्या आयुष्याचा विचार करु शकत नाही. आता हेच पाहा ना. साधं गणित किंवा बेरीज-वजाबाकी करायची झाली तरी देखील आपण जराही डोक्याचा वापर न करता सरळ कॅलक्यूलेटर उघडतो आणि आपलं काम करुन घेतो. याशिवाय दिवसभरातील वापरातील देखील अशा काही गोष्टी आहेत. गुगलमॅपबद्दल देखील कशीच कहाणी आहे. आज काल लोक कुठेही जायचं म्हटलं तरी गुगल मॅप वापरतो, अगदी रस्ता माहिती नसेल तरी त्याच्या भरोशावर लोक कुठेही जातात. पण विचार करा की त्या मॅपने तुम्हाल असा रस्ता दाखावला जो खरंतर रस्ताच नाही? ज्या रस्त्यावरुन कार जाऊ शकत नाही, त्यावरुन चालवली बस; हिमाचलचा Video अंगावर काटा आणणारा एक असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून आणि पाहून तुम्हीच ठरवा की यापुढे गुगल मॅपवर किंती अवलंबून रहावं ते. या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती आपली बाईक घेऊन समुद्राजवळ आला. तिथे त्याने पाण्यात आपली गाडी उतरवण्याचं धाडस केलं आणि तो सरळ निघून गेला आणि समुद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. Viral Video : प्रेयसीला जवळ घेत प्रियकराने केसात घातला हात, पुढचा प्रकार तुम्हाला पाहवणारच नाही हा संपूर्ण व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. कारण पुढे काय घडेल, असा विचार लोकांच्या पोटात गोळा आणणारा होता. पण नशीबाने ही व्यक्ती सुखरुप पोहोचली आहे. आता महत्वाचं म्हणजे या व्हिडीओत दिलेल्या माहिती प्रमाणे ही व्यक्ती गुगल मॅपचा वापर करुन जात होती. तेव्हा इथे रस्ता असल्याचं गुगल मॅप दाखवत होता. पण खरोखरं पहाता तो रस्ता समुद्रातून जात होता. याचाच अर्थ तिथे रस्ता नव्हता. हा व्हिडीओ naughtyworld नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. नेटिझन्स नेहमीप्रमाणेच या व्हिडीओवरही तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी तयार केला गेला आहे असे सांगितले जात आहे.
पण फक्त काही व्ह्यूजसाठी आणि प्रसिद्धीसाठी या व्यक्तीने आपले आयुष्या धोक्यात आणले होतो. असे अनेकांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. पण मजेसाठी असे धोके पत्कारने टाळा. या व्हिडीओचा विषय सोडला तर असे अनेक प्रकरण समोर आले आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांना गुगलमॅपवर विश्वास ठेवल्यामुळे काही संकटांना तोंड द्यावं लागलं.