मुंबई, 19 जून : आजकाल तुम्ही कुठेही नदी काठी किंवा समुद्र किनारी गेलात तरी तुम्हाला तिथे कपल पाहायला मिळतील. हातात हात घालून प्रेमाचे दोन शब्द बोलणारे, जोडीदाराच्या मांडीवर झोपणारे, तर काही एकमेकांच्या संभाषणात हरवणे कपल तुम्हाला दिसतील. काही जोडपी तर अगदी सगळी हद्द पार करत एकमेकांना किस करताना किंवा रोमान्स करताना ही जागो जागी पाहायला मिळतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कपल असा प्रकार करत आहेत, जे पाहून तुम्ही डोक्याला हात माराल. आता तुम्ही विचार कराल की किस आणि रोमान्स नाही तर मग त्याहून आणखी काय करत असावेत नदी किनारी… तर नदीकाठी प्रियकर चक्क आपल्या प्रेयसीच्या डोक्यातील उवा काढताना दिसला. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत… गर्लफ्रेंडला ट्रॉलिमधून वाऱ्याच्या वेगानं फिरवून सोडून दिलं आणि घडलं भयंकर हा प्रकार जवळील कोणीतरी आपल्या कॅमेरात कैद केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियकराच्या पुढ्यात केस मोकळे सोडून प्रेयसी बसली आहे. आधी पाहताना असं वाटत आहे की कदाचित प्रियकर प्रेमाने तिच्या केसांशी खेळत असावा. परंतू असं नाही. पुढे तुम्हाला दिसेल की हा तरुण त्याच्या प्रेयसीच्या केसातील उवाच काढत आहे. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी या जोडप्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे, तर काहींचं असं म्हणणं आहे की असा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं. पण आता या दोघांवर अशी वेळ का आली असावी? हे तर त्यांनाच ठावूक. हा व्हिडीओ कधी काढला गेला आणि तो कुठला आहे? हे अद्याप कळू शकलेलं नाही.