JOIN US
मराठी बातम्या / Viral / 5 किंग कोब्रा समोर फणा काढून बसले होते, तरीही त्यांना KISS करायला गेला व्यक्ती अन्.., Shocking Video

5 किंग कोब्रा समोर फणा काढून बसले होते, तरीही त्यांना KISS करायला गेला व्यक्ती अन्.., Shocking Video

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क खतरनाक किंग कोब्रा सापासोबत खेळताना दिसतो. या व्यक्तीने पुढे जे काही केलं, ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

जाहिरात

किंग कोब्राला केलं KISS

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 जून : साप हा एक असा जीव आहे, जो लांब दिसला तरी कोणाचाही थरकाप उडतो. माणूसच काय, तर अनेक प्राणीही त्याला पाहताच आपला रस्ता बदलतात. कारण सापाने चावा घेतल्यास मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहाणंच सगळे पसंत करतात. मात्र, काही लोक असेही आहेत, जे न घाबरता सापांना पकडताना किंवा त्यांच्यासोबत खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क खतरनाक किंग कोब्रा सापासोबत खेळताना दिसतो. या व्यक्तीने पुढे जे काही केलं, ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती एक, दोन नाही तर पाच किंग कोब्रांसोबत अजब कृत्य करताना दिसतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल, की आज या व्यक्तीचा शेवटचा दिवस आहे. कारण, कोब्रा त्याला सोडणार नाही. पण व्हिडिओमध्य़े काही वेगळंच पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती नागाने काढलेल्या फणावर किस करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ @earth.reel नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, त्या माणसाच्या कृतीवर तुमचं मत काय आहे ते सांगा. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांना हा व्हिडिओ पसंतीस उतरत आहे, पण कोब्रासारख्या धोकादायक सापासोबतही कोणी असं कृत्य करू शकतं, याचा विचार करून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. रात्री कारखान्यात मशीनमधून येत होता विचित्र आवाज; जे दिसलं ते पाहून जीव मुठीत धरून पळाले मजूर एका यूजरने लिहिलं आहे की, ही मूर्खपणाची हद्द आहे. त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो, तो वाचला, नाहीतर कोब्राने त्याला चेहऱ्यावर किस केलं असतं. आणखी एकाने लिहिलं आहे की, त्यामुळेच पुरुष महिलांपेक्षा कमी जगतात. अशी कृत्यच त्यांच्या जीवावर बेततात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या