व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 12 जुलै : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु यापैकी कोणता व्हिडीओ खरा आणि कोणता व्हिडीओ खोटो हे काही कळायला मार्ग नाही. काही असे लोक असतात जे प्रसिद्धासाठी व्हिडीओ क्रिएट करतात. तर काही व्हिडीओ हे खऱ्या घटनेचे देखील असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्याला पाहून लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला मगरीसमोर पाण्यात ढकलून देतो. ज्यानंतर हा व्हिडीओ संपतो. पण पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. Photo Viral : किंग कोब्रा आणि अजगरमध्ये भीषण लढाई, शेवट मात्र धक्कादायक हा व्हिडीओ काही मुलांचा आणि मगरीशी संबंधित आहे, या व्हिडीओत मगरी भक्षाच्या शोधात असल्याचे कळते. ती मगर किनाऱ्यावर पोहोचते. या मगरीला सगळी लहान मुलं एका लाकडी पुलावर उभे राहून पाहात असतात. त्या मगरीबद्दल काही लोक कुतुहलाने बोलत असतात. तर काही मुलं शांतपणे मगरीकडे पाहात असतात. तेव्हाच एक मुलगा आपल्या जवळील दुसऱ्या मुलाला मजेनं धक्का देतो, ज्यामुळे तो मुलगा खरोखर पाण्यात पडतो, तो ही त्या मगरीच्या एकदम पुढ्यातच. हा व्हिडीओ इथेच संपला आहे. पुढे या व्हिडीओत काय घडलं हे समजू शकलेलं नाही.
माहितीनुसार व्हिडीओ करत असलेल्या व्यक्तीने त्या चिमुकल्याला बाहेर काढलं गेलं आहे. परंतु या व्हिडीओचं सत्य काही समोर आलेलं नाही. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. अनेक युजर्सचं म्हणणं आहे की हा व्हिडीओ फेक आहे. तर काहींनी पाण्यातील मगर खोटी असल्याचं सांगितलं आहे. तर अनेकांनी तो चिमुकला ठिक आहे की नाही अशी विचारपूस केली आहे.