प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 10 मे : नऊ महिने बाळाला पोटात वाढवल्यानंतर एक आई आपल्या बाळाला जन्म देते. तिच्यासाठी हे नऊ महिने सोपे नसतात. आपलाच एक भाग म्हणून मुलाला वाढवणं, त्याची काळजी घेणं आणि वेदना सोसनं हे एकासाठी खूपच खास असतात. चिमुकल्या बाळाला हातात घेणं, स्वत:चा जीव म्हणून त्याच्याकडे पाहाणं एका आईसाठी खूपच महत्वाचं आणि तितकच भावनीक असतं, ज्यामुळे आपल्या बाळाच्या जन्माची आई आतुरतेनं वाट पाहात असते. पण केवळ आईच नाही तर मुलाचे वडील आणि इतर लोक देखील या क्षणाची आतुरतेनं वाट पाहातात. पण ब्राझीलमधील एका जोडप्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. ज्यामुळे एका आई-वडिलांचं स्वप्न अर्धवट तूटलं. दोघेही आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची वाट पाहत होते. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मात्र त्यांनी आपल्या बाळाला गमावलं. वाईट गोष्ट अशी की एका बापाने आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बाळाचे प्राण जाताना पाहिले आहे. अंधारात कोणीतरी चाटत होतं व्यक्तीचा अंगठा, लाईट लावून पाहाताच उडाली झोप ब्राझीलमधील एका दाम्पत्याने क्लिनिकस दा यूएफएमजी नावाच्या रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, डॉक्टरांनी बाळाच्या जन्मावेळीच त्याची मान कापली. होय, या जोडप्याचा आरोप आहे की, प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी बाळाच्या पोटावर इतका दबाव टाकला की बाळाची मान तुटली. त्यावेळी मी तेथे उपस्थीत होतो, असे मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे. बाळाच्या वडिलांनी सांगितले की त्याने त्यांचे मुल जीवंत गर्भात फिरताना पाहिले. ती जिवंत होती. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांला जीव गमवावा लागला. मृत बाळाची आई रानीली कोएल्हो सॅंटोसने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले की, तिला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या गरोदरपणात काही प्रॉब्लम्स आले होते, ज्यामुळे लवकर प्रसूती करण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासाठी जोडप्याने होकार दिला. डॉक्टरांनी वडिलांनाही ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावले. सर्व काही ठीक चालले होते. वडिलांनीही आपल्या मुलीला गर्भात फिरताना पाहिलं पण असं असलं तरी तो तिला जिवंत आपल्या कुशीत घेऊ शकला नाही. का बहुतांश किन्नर धर्म बदलून स्वीकारतात इस्लाम? या मागचं कारण लपलंय इतिहासात या दाम्पत्याचा आरोप आहे की, रुग्णालयाने त्यांना प्रकरण लपवून ठेवण्याची ऑफर दिली. यामध्ये त्यांना त्यांच्या या बाळाच्या मृतदेहाचे कोणत्याही प्रकारे तपासणी न करण्याचे आश्वासन द्यावे लागले. मात्र पालकांनी त्यास नकार दिला. आता हे दाम्पत्य आपल्या मुलीला न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.