नवी दिल्ली 26 मार्च : प्राण्यांचे मजेदार आणि हैराण करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. विशेषत: असे व्हिडिओ ज्यामध्ये दोन प्राण्यांमध्ये लढाई पाहायला मिळते. अशा प्रकारचे व्हिडिओ वापरकर्त्यांच्या जास्त पसंतीस उतरतात. हे व्हिडिओ इंटरनेटच्या जगात येताच काही काळातच व्हायरल होतात कारण त्यांना लाईक करणार्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळेच या व्हिडिओंना भरपूर व्ह्यूज आणि शेअर मिळतात. सध्या असाच दोन हत्तींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांशी लढताना दिसत आहेत. वाघ-सिंहाचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला श्वान; फायटिंगचा शेवट VIDEO मध्येच पाहा जंगलाची जवळून ओळख असलेले लोक हत्तींना अतिशय बुद्धिमान प्राणी मानतात. हा प्राणी एक प्रचंड, शक्तिशाली जंगली प्राणी आहे. परंतु जर त्याला राग आला तर हा प्राणी कोणालाही मारण्यासाठी पुरेसा आहे. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं, की ते त्यांच्या कळपांसह राहतात आणि सोबतच खातात-पितात. पण आज जो व्हिडिओ पाहायला मिळाला तो जरा वेगळा आहे. कारण यात दोन हत्ती एकमेकांशी भिडल्याचं दिसत आहे. त्यांना पाहताच जणू काही त्यांची कुस्ती चालू आहे, असं वाटतं!
झाडाझुडपांमध्ये जंगलात दोन हत्तींची लढाई होते. दोघंही इथे एकमेकांशी चांगलेच भिडलेले दिसतात. सुरुवातीला दोघंही सोंड आदळताना दिसतात. पण बघता बघता या भांडणाचं रुपांतर भयंकर लढाईत होतं. यावेळी एक हत्ती दुसऱ्याला जोराचा धक्का देतो, यात दोन्ही हत्ती एका मोठ्या झाडावर जाऊन आदळतात. हे हत्ती इतके विशालकाय आहेत, की ते झाडाला धडकताच झाडही खाली पडतं. मात्र यानंतरही त्यांचं भांडण सुरूच राहातं.
हे संपूर्ण दृश्य कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर SANParks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 70 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, हजारो लोकांनी लाईक केला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.