स्टंट करताना भीषण अपघात
नवी दिल्ली 02 जून : रस्त्यावरील स्टंटबाजीमुळे दरवर्षी कित्येक तरुणांना जीव गमवावा लागतो. मात्र स्टंटबाजी चुकीची आहे, हे त्यांना अजूनही समजत नाही. जर लोकांनी सावधपणे गाडी चालवली तर रस्ते अपघाताच्या घटना कमी होतील, पण टीव्ही बघून लोकांना स्वतःहून स्टंट्स करावं असं का वाटतं ते कळत नाही. या प्रकरणात ते केवळ आपला जीव धोक्यात घालत नाहीत, तर रस्त्यावरून सावधपणे चालणाऱ्यांचाही जीव धोक्यात घालतात. अलीकडे, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टंट करताना एका व्यक्तीसोबत मोठा अपघात होतो. Shocking Video: धावत्या कारच्या छतावर Push-Ups आणि जीवघेणा स्टंट, तरुणासोबत काय घडलं पाहा अलीकडेच @wheeliefeed या Instagram अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहेत आणि कारमध्ये बसलेले लोक त्यांच्या स्टंटची रील काढत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वात वाईट गोष्ट अशी आहे, की लोकांना लवकरात लवकर प्रसिद्ध होण्याची उर्मी आली आहे. या प्रकरणात लोक जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवतात.
या व्हिडिओतही तेच दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच छोटा आहे, पण त्यातील घटना इतकी मोठी आहे की तुम्ही थक्क व्हाल. कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, जे कदाचित स्टंट करणाऱ्यांचे मित्र असतील. रस्त्याने दुचाकीवरून दोन जण जाताना दिसत आहेत. मात्र ते बाईकवर बसलेले नाहीत, तर पूर्णपणे आडवे झालेले आहेत. त्यांचं डोकं पुढच्या दिशेने आणि पाय मागे आहेत. दोघंही दोन गाड्यांवर आहेत. मात्र अचानक यातील एका व्यक्तीचं लक्ष रस्त्यावरुन हटलं आणि पुढे जाणाऱ्या कारला त्याने जोरात धडक दिली. या व्हिडिओला 5.3 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, ही जीवन-मरणाची परिस्थिती आहे, लोकांनी हा व्हिडिओ पाहून हसू नये. यानंतर ती व्यक्ती वाचली की नाही, याचीही माहिती द्यावी, असं एकाने म्हटलं. तर आणखी एका यूजरने म्हटलं, की त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चितच झाला असावा. यासाठी हेल्मेट घालून दुचाकी चालवणं आवश्यक असल्याचं एकाने सांगितलं.