व्हायरल व्हिडीओ
मुंबई : हल्ली लग्नाचा सिजन सुरु आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील याच संबंधीत व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी धक्कादायक क्षणांचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खरोखरंच पोटा गोळा आणणारा आहे. लग्न सुरु असताना यथे असा प्रकार घडला की, लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला. लग्नाचा प्रत्येक क्षण नवरा आणि बायकोसाठी खूप खास असतो, त्यामुळे हा प्रत्येक क्षण टिपला जावा अशी इच्छा नवरा-नवरीची असते, ज्यामुळे ते कॅमेरामॅनला बोलावतात. कॅमेरामॅन देखील खूप मेहनत घेऊन वेगवेगळ्या एँगलने फोट काढतात. पण असं करत असतानाच कॅमेरामॅन कडून एक चुक घडली आणि सगळंच संपलं.
हा व्हिडीओ लग्नाचा व्हिडीओ आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा आणि नवरी कार्यक्रमासाठी उभे आहे. तेव्हा त्यांच्यावर कॅमेरामॅन एक मोठी लादी घेऊन उभा असतो. तो या दगडाच्या लादीच्या सह्याने फोटो काढत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तेव्हा कॅमेरामॅनच्या हातातून लादी सुटते आणि थेट खाली उभ्या असलेल्या नवऱ्यावर आणि त्याच्या नातेवाईकांवर पडते. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral यानंतर नवरा बेशुद्ध होऊन खाली पडला आहे. शिवाय इतर नातेवाईकांनाही दुखापत झाली. हा व्हिडीओ इथेच थांबला आहे. पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि या घटनेत जखमींची परिस्थिती कळू शकलेली नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो खूप शेअर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ खरोखर खूप धोकादायक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.