व्हायरल
नवी दिल्ली, 17 एप्रिल : समुद्र आणि समुद्राच्या खोलात असणारं जीवन याविषयी कायमच कुतुहल वाटत असतं. समुद्राविषयी लिहिणं, पाहणं, नवनवीन गोष्टी जाणून घेणं याची बऱ्याच जणांना आवड असते. समुद्रातील निरनिराळ्या गोष्टींविषयी अनेक संशोधन झालं आहे. याविषयी आणखी गोष्टी जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी एक संशोधन करण्यात आलं होतं. यातून जे समोर आलं ते पाहून सर्वच थक्क झाले. गेल्या वर्षी यूएक नेव्हीने महासागराची विलक्षण गोष्टी टिपण्यासाठी डॉल्फिनवर गोप्रो कॅमेरे बसवले होते. कॅमेऱ्यात जे टिपलं गेलं हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. डॉल्फिनने अनेक मासे, साप खाल्ल्याचं टिपलं गेलं. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, ही दृश्ये पाहून वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले. कारण विषारी साप खाणे डॉल्फिनसाठी धोकादायक ठरू शकते. GoPro कॅमेरे सहा महिन्यांसाठी पाण्याखालील फुटेजसाठी प्रशिक्षित सहा बॉटलनोज डॉल्फिनशी जोडलेले होते. सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथील नॅशनल मरीन मॅमल फाउंडेशनच्या शास्त्रज्ञांनी ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि लाइव्ह-स्ट्रीमिंग करून केलेला हा अभ्यास होता.
डॉल्फिन समुद्राच्या पाण्यात डुबकी मारत असताना 200 हून अधिक मासे आणि सागरी साप पकडताना कॅमेऱ्याने टिपले. कॅमेऱ्यांनी सहा महिन्यांचे फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्ड केले. फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डमुळे शास्त्रज्ञांना या सस्तन प्राण्यांच्या शिकारीची रणनीती आणि संप्रेषण पद्धती समजण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, Inside Edition नावाच्या यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडीओदेखील शेअर करण्या आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि व्ह्युज आले आहेत. याशिवाय अनेकांनी व्हिडीओला लाईकदेखील केलं आहे.