JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! मृत माशाच्या पोटात सापडला 44 कोटी रूपयांचा खजिना; असं नेमकं काय आढळलं, पाहा

OMG! मृत माशाच्या पोटात सापडला 44 कोटी रूपयांचा खजिना; असं नेमकं काय आढळलं, पाहा

गेल्या महिन्यात स्पेनचं कॅनरी बेट ला पाल्मा येथील नोगेल्स बीचवर एक व्हेल आढळून आला होता. मृतावस्थेत सापडलेल्या या व्हेलची किंमत 44 कोटींहून अधिक असू शकते

जाहिरात

मृत माशाच्या पोटात सापडला खजिना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 05 जुलै : गेल्या महिन्यात स्पेनचं कॅनरी बेट ला पाल्मा येथील नोगेल्स बीचवर एक व्हेल आढळून आला होता. मृतावस्थेत सापडलेल्या या व्हेलची किंमत 44 कोटींहून अधिक असू शकते, असं आता सांगितलं जात आहे. कारण त्याच्या आतड्यांमध्ये लपलेला एक मौल्यवान खजिना वैज्ञानिकांना सापडला आहे. लास पाल्मास विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थ अँड फूड सेफ्टीचे प्रमुख अँटोनियो फर्नांडीज रॉड्रिग्ज यांना व्हेलच्या शवविच्छेदनादरम्यान आढळून आलं, की ती पचनाच्या समस्येमुळे मरण पावली आहे. माशाच्या पोटात काहीतरी वस्तू अडकलेली आढळली, जी त्याच्या मृत्यूचं कारण ठरली. व्हिऑनच्या रिपोर्टनुसार, लास पाल्मास विद्यापीठातील शास्त्रज्ञ रॉड्रिग्ज म्हणाले, “मी जे बाहेर काढलं ते सुमारे 9.5 किलो वजनाचा दगड होता. माझ्या हातात जे आहे ते अ‍ॅम्बरग्रीस आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. असा अंदाज आहे, की रॉड्रिग्जच्या हातातील दगडाची किंमत $5.4 दशलक्ष (सुमारे 44 कोटी रुपये) पेक्षा जास्त असू शकते. आता संस्था अ‍ॅम्बरग्रीस खरेदी करू शकेल अशा खरेदीदाराच्या शोधात आहे. 2021 मध्ये ला पाल्मा येथे उद्रेक झालेल्या ज्वालामुखीच्या घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी या पैशाचा वापर केला जाऊ शकतो. Whale Vomit: उलटीलाही कोट्यवधींची किंमत, तज्ज्ञ म्हणतात हे तरंगणारं सोनं! व्हेल च्या उलटीला सामान्यतः अ‍ॅम्बरग्रीस म्हणतात. अ‍ॅम्बरग्रीस हे नाव जुना फ्रेंच शब्द ‘एम्बर’ आणि ‘ग्रिस’ वरून आलं आहे. व्हेल हा मेणासारखा पदार्थ उलटीच्या स्वरूपात तयार करतात, जो मच्छिमारांना समुद्रात तरंगताना आढळतो. व्हेल सहसा मोठ्या प्रमाणात स्क्विड आणि कटलफिश खाऊन जगतात. मात्र, त्यातील बहुतांश भाग पचत नाही आणि उलटीच्या स्वरूपात बाहेर येतो. त्याचा काही भाग पचनसंस्थेत राहतो आणि वर्षानुवर्षे एकत्र जमा होऊन अ‍ॅम्बरग्रीस तयार होतो. याला समुद्राचा खजिना किंवा तरंगणारं सोनं म्हटलं जातं. कारण परफ्यूम कंपन्या सुगंध टिकवून ठेवण्यासाठी अ‍ॅम्बरग्रीसमधून काढलेलं अ‍ॅम्बरीन अल्कोहोल वापरतात. या वस्तूच्या दुर्मिळतेमुळे युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत अ‍ॅम्बरग्रीस ठेवण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या