व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 27 जुलै : सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात जे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. हे व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी आपल्याला वेड लावणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला ‘आता काय म्हणावं?’ असाच प्रश्न पडेल. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो शाळकरी मुलांशी संबंधित आहे. दृश्य लहान मुलांच्या वर्गाशी संबंधित आहे. Viral Video : “पाचमधून पाच वजा केले तर किती उरले?” या खोडकर मुलाचं उत्तर ऐकाल तर पोट धरुन हसाल इथे शिक्षक मुलांना शिकवत आहेत पण त्याच दरम्यान एक मुलगा मस्ती करत असतो म्हणून शिक्षक मुद्दाम त्याला उठवतात आणि प्रश्न विचारु लागतात. आपल्यासोबत देखील अनेकदा शाळेत असं झालं असेल. गप्पा मारल्या किंवा वर्गात लक्ष नसलं की शिक्षक प्रश्न विचारायचे. असंच या लहान मुलासोबत झालं. पण हा मुलगा इतका हुशार होता की त्याचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर शिक्षकांने या चिमुकल्याला विचारलं की ‘द’ ने काय येतं? तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते मजेदार आहे. याला उत्तर देताना एक मुलगा म्हणाला उत्तर देताना एक मुलगा म्हणाला, ‘द’ म्हणजे दवाई (औषध) , दुसरा म्हणतो ‘द’ म्हणजे दादी (आजी), आणि तिसरे मूल म्हणते ‘द’ म्हणजे दात.
आता शिक्षक मागच्या बाकावर बसलेल्या मुलाला विचारतात, तेव्हा तो तो क्षणभर थांबतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो, द से दारू. असे म्हणताच शिक्षकाने डोके धरले. ही मुलं हिंदी शाळेतील असल्यामुळे ती हिंदीत उत्तर देत होती. मुलाचे उत्तर ऐकून शिक्षकाने त्याचे डोके धरल्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. हा व्हिडीओ पाहून लोकांनी तर हे मान्यच केलं आहे की आजकालची मुलं ही फारच हुशार असतात. मात्र, हा व्हिडीओ प्रँकचा ही एक भाग असू शकतो. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे आणि तो खरा आहे की मनोरंजनासाठी तयार केला गेला आहे हे अजूनही कोणाला समजलेलं नाही, पण व्हिडीओ फारच मजेदार आहे एवढं मात्र नक्की.