मुंबई 25 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. परंतू येथे आपल्याला असे काही व्हिडीओ देखील पाहायला मिळतात जे एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर येतात. असाच एक व्हिडीओ आपल्या समोर आला आहे, जो आपल्याला जाणीव करुन देतात की आपण रस्त्यावर किती सतर्क राहण्याची गरज आहे. रस्त्यावर अनेक प्रकारचे अपघात झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. हे पघात कधी चालकाच्या चुकीमुळे तर कधी वाहनातील अंतर्गत बिघाडामुळे होतात. परंतू अशावेळी जरी आपण योग्यवेळी सतर्क राहिलो तरी देखील आपल्याला यातून वाचता येईल. नक्की या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? या व्हिडीओमध्ये एक कार रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. परंतु काही क्षणांनंतर या कारसोबत काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नसेल. रस्त्यात पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. हे वाचा : Video : चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट पावसामुळे रस्ता ओला आणि निसरडा झाला आहे, ज्यामुळे त्यावरुन गाडी घसरते. यादरम्यान त्यातून ठिणग्या निघू लागतात. परंतु या ठिणग्यांमुळे अखेर गाडीचं चाक फुटतं आणि गाडी जागेवर थांबते.
नशीबाने या अपघातामुळे कोणाचेही प्राण गेले नाही. परंतु या कारच्या आजूबाजूला एखादी गाडी असती तर केवढा मोठा अपघात घडला असता हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हे वाचा : मौजमस्तीसाठी बैलाच्या शिंगाला आग लावली; पण त्यानंतर जे घडलं, त्याचा विचार करणं अशक्य हा व्हिडीओपाहून सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ज्यावर लोकांनी खराब रस्त्यांनाही या घटनेसाठी दोषी मानलं आहे. तर अनेकांनी रस्ता सुरक्षाबाबत काही माहिती देखील सांगितली आहे. अवघ्या 13 सेकंदाच्या या व्हिडीओनेही लोकांना चांगलेच धास्तावले आहे. त्यामुळे तुम्ही देखील गाडी चालवताना किंवा रस्त्यावरुन जाताना सावध राहा.