JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर भांडत होते तरुण, भरधाव वेगात आली कार आणि... Video अंगावर काटा आणणारा

रस्त्यावर भांडत होते तरुण, भरधाव वेगात आली कार आणि... Video अंगावर काटा आणणारा

कधी-कधी लोक अशा काही चुका करुन बसतात की, त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, याचा ते विचार देखील करत नाही.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 डिसेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. इथे एकदा का तुम्ही आलात की तुम्हाला तेथे हजारो व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्या संवेदना उडवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे. कधी-कधी लोक अशा काही चुका करुन बसतात की, त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, याचा ते विचार देखील करत नाही. असंच या व्हिडीओमध्ये घडलं. हे ही पाहा : रस्ता अपघाताचा थरारक Video, डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं रस्त्यावर जेव्हा काही तरुण एकमेकांमध्ये मारामारी करत होते. तेव्हाच एक भरधाव काय येते आणि ती तीन-चार तरुणांना थेट उडवून घेऊन जाते. हा अपघात खूपच भयानक आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला काही तरुण भांडताना दिसत आहेत. त्यांची ही भांडणं कारवरुनच झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हे तरुण एकमेकांना लाथा-बुक्या मारत होते. तेव्हाच एक भरधाव गाडी येते आणि कोणाला काही कळण्याआधीच ४ तरुणांना उडवते. त्यांपैकी एक तरुण जवळच पडला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली असल्याचे दिसते. पण इतर दोन लोकांना मात्र या कारने दुरवर उडवलं. यामध्ये एका तरुणाचा जीव गेला असल्याचे म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ समोरुन येणाऱ्या कारमध्ये रेकॉर्ड झाला. हे ही पाहा : रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेल्या कारला ट्रक न दिली धडक, तेवढ्यात ट्रेन आली आणि.. पाहा Video रस्त्यावर होणारी ही भांडणं पाहून ती कार तेथेच थांबते. पण तितक्यात ही भरधाव कार काहीही न पाहाता थेट निघून जाते.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ ट्वीटरवर Officialgore नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या