हॉरर व्हिडीओ
नवी दिल्ली, 04 मे : माणसाच्या शरीरात घुसणाऱ्या भुताला तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात कधी असं पाहिलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक भूत एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात घुसताना दिसलं. रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात या भुताने प्रवेश केला. हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. भुताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ रिअल असल्याचा दावा केला जातो. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात तुम्ही एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात भूत घुसत असल्याचं स्पष्टपणे पाहू शकता. हा हॉरर व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सुरुवातील समोरच्या रस्त्याने एक व्यक्ती चालत येताना दिसते. त्यानंतर दुसऱ्या बाजून दुसरी व्यक्ती येते. माऊंट एव्हरेस्टमधून दररोज रात्री येतो भयावह आवाज; सत्य समजताच शास्त्रज्ञही हादरले दोघं जण थोडं एकमेकांच्या जवळ येता. तसं समोरून येणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडताना दिसतं. एक सावली… जी हवेत उडत पाठमोऱ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाते आणि त्या व्यक्तीच्या शरीरात घुसते. त्या व्यक्तीला झटका बसल्यासारखं होतं आणि तिची शारीरिक हालचालही बदलल्यासारखी दिसते. नेटिझन्स हा व्हिडीओ पाहून शॉक झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने खरंच मीसुद्धा असं घडताना पाहिलं आहे, असं म्हटलं आहे. तर एका युझरने तुम्ही काही अदृश्य गोष्टी पाहू शकत नाहीत, पण त्या खरंच असतात. असं म्हटलं. VIDEO - जेसीबीतून आला ‘यमराज’, तर बोलेरोतून ‘देव’; चमत्कार पद्धतीने वाचला तरुणाचा जीव @mysteriesfootag ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओतील ही सावली म्हणजे भूत किंवा आत्मा आहे, याचं समर्थन न्यूज 18 लोकमत करत नाही. पण तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.