दुर्मिळ प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल.
मुंबई, 01 मार्च : असे कित्येक प्राणी आहेत, ज्यांना आपण पाहिलेलंही नसतं. त्या प्राण्यांबाबत आपल्याला काहीच माहिती नसते. असाच एक प्राणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्राणी कोण आहे, ते कुणीच ओळखू शकलेलं नाही. कारण हा प्राणी तसा दुर्मिळ आहे, जो फार दिसत नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी परवीन कासवना यांनी या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा प्राणी कोण हे ओळखण्याचं चॅलेंज त्यांनी युझर्सना दिलं आहे. या प्राण्याबाबत थोडक्यात त्यांनी माहितीही ट्विटरमध्ये दिली आहे. ‘हा सुंदर आणि दुर्मिळ प्राणी आहे, जो लडाखमध्ये आढळतो. हा कोण आहे सांगा’, असा सवाल त्यांनी केला आहे. VIDEO - इवल्याशा उंदराने मिनिटात गिळले 10 गाजर; बकाबका खाल्ल्यानंतर घडलं ते धक्कादायक फक्त 45 सेकंदाचा व्हिडीओ आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता. मोठ्या मांजरीसारखा दिसणारा हा प्राणी. जो इथंतिथं फिरतो आहे. या विचित्र प्राण्याला पाहून श्वानही त्याच्यावर भुंकत आहेत.
दरम्यान नेटिझन्स हा प्राणी कोण आहे, त्याचा अंदाज लावत आहेत. व्हिडीओ पाहून हा प्राणी कोण ते तुम्ही ओळखा पाहू? अबब! असा बकरा ज्याला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा; किंमत इतकी की वाचूनच चक्कर येईल तुम्ही या प्राण्याला ओळखलंत तर ठिक, नाहीतर काही युझर्सनी अंदाजे या प्राण्याचं नाव सांगितलं आहे.
काही लोकांनी हा बनविलाव म्हणजे लँक्स असल्याचं म्हटलं आहे. हा प्राणी युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील जंगलात आढळतो. छोटी शेपटी असलेल्या मांजरींच्या प्रजातींपैकी तो एक आहे. तो पक्षी आणि छोट्या स्तनधाऱ्या प्राण्यांना खातो.