JOIN US
मराठी बातम्या / Viral / एक दोन नाही तब्बल 150 अजगर, या अभयारण्यात आहे सापांचे साम्राज्य!

एक दोन नाही तब्बल 150 अजगर, या अभयारण्यात आहे सापांचे साम्राज्य!

राजस्थानमधील भरतपूरचे केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणाला काही लोक पक्ष्यांचे स्वर्ग म्हणतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ललितेश कुशवाहा (भरतपूर) 10 मार्च : राजस्थानमधील भरतपूरचे केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणाला काही लोक पक्ष्यांचे स्वर्ग म्हणतात. पहिल्या 29 किलोमीटर परिसरात, हे उद्यान अनेक वन्य प्राण्यांसह सापांच्या डझनहून अधिक प्रजातींचे क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. अनेक साप असे असतात की दंश केल्यानंतर अवघ्या अवघ्या काही मिनीटांत उपचार न मिळाल्याने मृत्यूही होतो.

भारताच्या दृष्टीने केवलदेव जंगलामध्ये अजगरांची संख्या सर्वाधिक आहे. तज्ञांच्या मते, केवलदेव नॅशनल पार्क हा भारतातील सर्वात मोठा पायथन पॉइंट देखील मानला जातो. या बागेला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा मानला जातो. कारण देश-विदेशातील 350 हून अधिक प्रजातींचे पक्षी येथे 4-5 महिने वास्तव्य करतात.

मांजरीला त्रास देणं सापाला भोवलं; शेवटी झाली अशी अवस्था की पाहून व्हाल शॉक..VIDEO

संबंधित बातम्या

वन्यजीव छायाचित्रकार कैलाश नवरंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवलदेव राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असले तरी. पण त्यांच्यासोबत इतर प्रकारचे जीवही राहतात. या बागेत जवळपास 13 प्रकारचे साप असल्याची माहिती फार कमी लोकांना आहे.

यातील काही साप असे आहेत की त्यांनी एखाद्याला चावल्यास योग्य वेळी उपचार न मिळाल्याने काही सेकंदात मृत्यू होऊ शकतो. या बागेत कॉमन कोब्रा, बँडेड क्रेट आणि वायपर, वॉटर स्नेक, रॅट स्नेक आणि वुल्फ स्नेक, बिनविषारी, इंडियन कोब्रा, इंडियन क्रेट, रसेल वाइपर, क्रेट, सॉ-स्केल्ड व्हायपर इत्यादी साप आढळतात.

जाहिरात

150 हून अधिक अजगर

केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे रॉक पायथॉनचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. येथे 150 हून अधिक अजगर आढळतात. तर केवलदेव राष्ट्रीय उद्यानात सापडलेल्या अजगराची लांबी 15 ते 25 फूट आहे.  

समोर सिंह दिसताच हत्तीनं केलं असं काही की पाहून हसू आवरणार नाही…मजेशीर VIDEO

याचबरोबर वन्यजीव तज्ज्ञ सुब्रमण्यम भूपती यांना संशोधना दरम्यान आढळले की, देशात सर्वाधिक रॉक अजगर फक्त केवलदेव राष्ट्रीय उद्यानात आढळतात. वास्तविक केवलदेव राष्ट्रीय उद्यानात अजगरासाठी भरपूर अन्न उपलब्ध आहे. तसेच, अनुकूल परिस्थिती आणि भक्षकांचा कमी धोका यामुळे पायथनसाठी हे योग्य ठिकाण आहे

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या