JOIN US
मराठी बातम्या / Viral / त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली... घटनेचा थरारक Video व्हायरल

त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली... घटनेचा थरारक Video व्हायरल

ट्रेन जाणार असते म्हणून लोकांना आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतू असं असतानाही काही लोक तेथे न थांबता रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 30 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो आपल्यासमोर एक उदाहरण ठेवत आहे की, लोकांनी नियम मोडले की त्यांच्यासोबत काय घडू शकतं. खरंतर असे अनेक नियम आहेत, जे शासनाने आपल्या फायद्या आणि सुरक्षेसाठी बनवले आहेत. परंतू आपण त्याकडे लक्ष न देता नियम मोडत राहातो. असंच काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका व्यक्तीसोबत गंभीर घटना घडली. हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोकांना आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतू असं असतानाही काही लोक तेथे न थांबता रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हे वाचा : रस्त्याच्याकडेला मस्ती करणं तरुणाला पडलं महागात, धावताना समोरुन आली कार आणि…Video व्हायरल या व्हिडीओमध्ये आधी एक ट्रेन येते. तेव्हा काही लोक आपल्या गाड्या घेऊन या ट्रेनपर्यंत पोहोचतात. परंतु त्यानंतर आणखी एक ट्रेन येते, ज्यामुळे पुढे आलेल्या लोकांना पुन्हा मागे जावं लागतं. लोकं ट्रेनचा आवाज ऐकताच इकडे तिकडे पळू लागले.

संबंधित बातम्या

अशावेळी एक व्यक्ती आपली बाईक वळवत होती. परंतु तोपर्यंत गाडीचा तोल गेला आणि ती खाली पडली. या व्यक्तीने पुन्हा आपली बाईक बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु बाईक काही मागे आलीच नाही. अखेर तेथे 110 किमी प्रति तास वेगाने एक ट्रेन आली, ज्यामुळे या व्यक्तीच्या बाईकचे तुकडे झाले. हे वाचा : एक डुलकी आणि कोट्यवधींचं नुकसान! मिनी क्रेनमध्ये झोपणाऱ्या चालकासोबत काय घडलं, पाहा Video ही गाडी ट्रेनच्या इंजिन खाली अडकली होती, जी ट्रेनने जवळ-जवळ अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेली. ज्यानंतर ट्रेन चालकाने ट्रेनला ब्रेक लावून या अपघाताची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यावर आरपीएफ आणि तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकलेल्या दुचाकीचे तुकडे काढून गाडी पुढे पाठवण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या