JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामॅननी मारला चान्स; लाजिरवाण्या कृत्याचा VIDEO

प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामॅननी मारला चान्स; लाजिरवाण्या कृत्याचा VIDEO

कपलला रोमँटिक पोझ समजवताना कॅमेरामॅननी जे केलं ते पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.

जाहिरात

प्री-वेडिंग फोटोशूटचा शॉकिंग व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मे :  लग्न म्हटलं की वेडिंग फोटोशूट आलंच. पण हल्ली प्री-वेडिंगची क्रेझ आहे. म्हणजे लग्ना आधीही नवरा-नवरीचं फोटोशूट होतं. ज्यात रोमँटिक ठिकाणी त्यांच्या रोमँटिक पोझही असतात. कॅमेरामनन कपलला या रोमँटिक पोझ दाखवतो, ते सीन कसे द्यायचे हे सांगतो. अशीच एक रोमँटिक पोझ एका कपलला समजवताना कॅमेरामननी चान्स मारला. त्यांचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये कॅमेरामॅनने जे केलं ते पाहूनच तुम्हाला लाज वाटेल. वधू-वराला रोमँटिक पोझ दाखवता दाखवता कॅमेरामन आऊट ऑफ कंट्रोल झाला. त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. फोटो काढताना कॅमेरामन असं काही करू शकतो, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. असं या कॅमेरामनने काय केलं आहे ते पाहुयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कपल उभं दिसतं आहे. त्यांच्यासमोर सुरुवातीला एक कॅमेरामॅन दिसतो आहे. तो त्या कपलला काहीतरी समजावताना दिसतो आहे. त्याच्यासोबत आणखी एक दुसरा कॅमेरामन आहे. कपलला नीट समजावं म्हणून दोघं कॅमेरामॅन कपल बनून त्यांना डेमो दाखवतात. दोघंही रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या जवळ येतात. त्यानंतर एकमेकांच्या चेहऱ्यावर हात ठेवतात आणि तेच रोमँटिक होतात. त्यांना दुसऱ्या कुणाचंच भान राहत नाही. कॅमेरामॅनचं असं कृत्य पाहून त्यांच्यासमोर असलेलं कपललाही धक्का बसतो. ते दोघंही त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना ओरडून ताळ्यावर आणतात. तेव्हा दोघंही कॅमेरामन दचकतात आणि एकमेकांपासून दूर होतात. @videonation.teb इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या