JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाला रिअल सिंघमनं काढलं बाहेर, स्वतः उचलून घेत रुग्णालयात पोहोचवलं अन् डॉक्टर म्हणाले...

VIDEO: डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाला रिअल सिंघमनं काढलं बाहेर, स्वतः उचलून घेत रुग्णालयात पोहोचवलं अन् डॉक्टर म्हणाले...

हेमंतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेलं होतं. गिरीश शर्मा यांनी या मुलाला उचलून घेतलं आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धाव घेतली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 10 ऑगस्ट : एका पोलिसानं लहान मुलाचा जीव वाचवत माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. घटनेत एका पोलिसानं डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवला (Police Saves a Life of Minor Boy) आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दतिया येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दतिया चिरुला येथील रहिवासी असलेला अकरा वर्षांचा हेमंत अंगूरी नदीच्या किनाऱ्यावर बकरी चारण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, पाय घसरल्यानं हेमंत अंगूरी नदीच्या डॅममध्ये कोसळला. हेमंत बुडू लागलेला असतानाच शेजारी असणाऱ्या काही लोकांची नजर या मुलाकडे गेली. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चिरुला ठाण्याचे प्रभारी गिरीश शर्मा पाच मिनिटाच्या आतच पोलिसांच्या टीमसोबत या डॅमकडे निघाले. घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावरच रेल्वे फाटक आहे, ते संध्याकाळी बंद झाल्यावर किमान 20 ते 25 मिनिटं उघडत नाही. गिरीश शर्मा पोहोचले तेव्हा हे फाटक बंद होतं. यानंतर त्यांनी गाडी फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाच सोडली आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते डॅमकडे पोहोचले. पाकिस्तानी तरुणामुळे राहुलला परत मिळालं हरवलेलं वॉलेट; सिनेमाप्रमाणंच आहे घटना इकडे डॅममध्ये हेमंत स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तो बुडू लागला होता. घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. गिरीश शर्मा यांनी पोलिसांच्या मदतीनं त्या मुलाला बाहेर काढलं. यादरम्यान हेमंतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेलं होतं. गिरीश शर्मा यांनी या मुलाला उचलून घेतलं आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धाव घेतली. यादरम्यान रेल्वे फाटकही आलं मात्र ते अजूनही बंदच होतं. अशात गिरीश शर्मा यांनी याच परिस्थितीत ट्रॅक पार केला आणि या मुलाला रुग्णालयात पोहोचवलं.

संबंधित बातम्या

VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले डॉक्टरांनी लगेचच या मुलावर उपचार सुरू केले. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी म्हटलं, की पाच मिनिटंही उशीर झाला असता, तर हेमंतचा जीव वाचवणं शक्य झालं नसतं. काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या