प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 11 जून : जगात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. काही प्राण्यांना आपण घरी पाळतो तर काही जे जंगली प्राणी असतात. या प्राण्यांपैकीच एक म्हणजे डुकर. तुम्ही नेहमीच डुकरांना गलिच्छ ठिकाणी राहाताना पाहिले असणार. ते नेहमीच चिखलात राहातात. तेथीलच काहीतरी खाताना तुम्ही पाहिलं असेल. पण तुम्हाला माहितीय का की तरीही डुक्कर हा सर्वात स्वच्छ प्राण्यांमध्ये येतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, डुक्कराचं नाव स्वच्छ प्राण्यांच्या यादीत येतो. मग तुम्ही म्हणत असाल की हे कसं शक्य आहे? चला आपण डुक्कराबद्दल काही तथ्य जाणून घेऊ. Viral Video : देशी दारु अशी चढली की, व्यक्ती स्वत:ला थेट ‘सुपरमॅन’ समजू लागली आणि मग… खरंतर डुक्कर चिखलात राहातात यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती मिळवू. जेव्हा आपल्याला गरम होतं तेव्हा आपल्याला घाम येतो. जेव्हा आपल्याला घाम येतो, तेव्हा आपले शरीर तापमान नियंत्रित करत असते. या दरम्यान घाम ग्रंथी घाम स्राव करतात. ज्यामुळे आपलं शरीर थंड राहण्यासाठी मदत होते. पण डुकरांना घामाच्या ग्रंथी नसतात आणि त्यांना घाम येत नाही. म्हणूनच ते स्वतःला थंड करण्यासाठी चिखलात बुडतात. चिखलात राहिल्याने त्यांच्या त्वचेला उन्हापासून संरक्षण मिळते. डुकरांना अतिशय घाणेरडे प्राणी मानले जाते, परंतु काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, डुक्कर खरोखर स्वच्छ प्राणी आहेत. ते त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी शौच करणे टाळतात. याशिवाय त्यांना आवडेल तेव्हाच ते अन्न खातात. विमानाचं मायलेज किती असू शकतं? तुम्ही अंदाजाही लावू शकणार नाही इतका मोठा आकडा डुक्कर हा बुद्धिमान प्राणी डुकरांची बुद्धिमत्ता मानवी मुलासारखीच असते, ज्यामुळे त्याला जगातील पाचव्या क्रमांकाचा बुद्धिमान प्राणी मानलं जातं. तो कुत्र्यांपेक्षा ही अधिक हुशार आणि प्रशिक्षित आहेत. डुक्कर फक्त दोन आठवड्यांत त्यांचे नाव ओळखतात आणि त्या नावाने हाक मारल्यावर येतात. डुकरांबद्दलची सर्वात मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की, मादी डुकरा त्यांच्या पिलांना दूध पाजताना गुणगुणतात. नवजात मुले देखील त्यांच्या आईच्या आवाजाकडे धावायला शिकतात. डुकरांना 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ग्रंट्स आणि स्क्वल्स आहेत जे ओळखले गेले आहेत. डुक्कर एकमेकांना चिकटलेले असतात आणि त्यांना एकमेकांच्या जवळ झोपायला आवडतात.