JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात भयावह PHOTO; जो काढल्यानंतर Photographer ने केला स्वतःच्या आयुष्याचा शेवट

जगातील सर्वात भयावह PHOTO; जो काढल्यानंतर Photographer ने केला स्वतःच्या आयुष्याचा शेवट

या फोटोसाठी फोटोग्राफरला पुरस्कारही मिळाला पण हा फोटो जगातील वादग्रस्त फोटो ठरला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुदान, 03 जून : फोटोमध्ये खूप काही दडलेलं असतं. फोटो खूप काही सांगतात. काही फोटोग्राफर्सचे फोटो इतके बोलके, भावनिक असतात की ते हृदयाला भिडतात. अशाच प्रतिभावान फोटोग्राफर्सपैकी एक म्हणजे केव्हिन कार्टर. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या केव्हिनने फोटोग्राफी करत इतिहास रचला. त्याचे फोटोग्राफ खूप प्रसिद्ध झाले. तो जगातील एक महान फोटोग्राफर बनला. त्याला बरेच पुरस्कार मिळाले. पण क्याचे काही फोटो जितके प्रसिद्ध तितकेच ते वादग्रस्तही ठरले. असाच एक वादग्रस्त फोटो काढल्यानंतर केव्हिनने स्वतःचं आयुष्यच संपवून टाकलं. असं या फोटोत होतं तरी काय? केव्हिनने मार्च 1993 मध्ये हा काढला होता. या फोटोने संपूर्ण जग हादरलं सुदानमधील हा फोटो. 26 मार्च 1993 रोजी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने हा फोटो एका लेखासह प्रकाशित केला होता. हा फोटो पाहून लोक इतके त्रस्त झाले की त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन केला. 1994 मध्ये केविनला या फोटोसाठी जगप्रसिद्ध पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि त्याची कीर्ती देश-विदेशात झाली. यानंतर 27 जुलै 1994 रोजी त्याने दक्षिण आफ्रिकेतील एका नदीच्या काठावर  केव्हिनने आपली कार पार्क केली. त्यातून बाहेर पडणारा विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू नदीच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये टाकून तो श्वास घेऊ लागला. त्याने आपले जीवन संपवले. तो, ती आणि साप! आयुष्यात कधीच पाहिली नसेल अशी अनोखी LOVE STORY त्याने एक सुसाईड नोट देखील मागे सोडली ज्यामध्ये त्याने लिहिले - “मला माफ करा. जीवनातील दुःखं आनंद इतक्या प्रमाणात नष्ट करतात की जीवनात आनंदाचं नाव किंवा खुणा उरत नाही. मी उदास आहे. फोनशिवाय, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, भाड्याचे पैसे नाहीत. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पैसा लागतो. मृतदेहांच्या आठवणी, हत्या, राग, वेदना, उपासमारीची मुलं मला सतावतात. मी भाग्यवान असल्यास, मी आता केनला भेटेन.” केव्हिनने काढलेल्या त्या फोटोत काय होतं? ‘द व्हल्चर अँड द लिटल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा फोटो सुदानचा आहे. ज्यात एक लहान मुलगी भुकेमुळे रस्त्यावर पडलेली दिसते. त्याच्या मागे एक गिधाड बसलं आहे. फोटो पाहून समजतं की गिधाड त्या चिमुकलीच्या मृत्यूची वाट पाहत आहे जेणेकरून ते तिला खाऊ शकेल. फोटो काढल्यानंतर काही दिवसांनी फोटोतील ती मुलगी नसून कोंग न्योंग नावाचा मुलगा असल्याचं समोर आलं. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी त्या मुलाच्या प्रकृतीबाबत विचारलं, तो वाचला की नाही अशी विचारणा केली. ALERT! लक्षात ठेवा ही तारीख, या दिवशी सर्वात भयानक संकट; NASA चा इशारा अनेकांनी या फोटोवरून केव्हिनवर टीका केली. केव्हिन फक्त एका चांगल्या फोटोसाठी भुकेला होता, त्याने मुलीला वाचवलं नाही, असं म्हणाले. काही लोक तर केव्हिनला दुसरं गिधाड म्हणू लागले. या सगळ्या गोष्टी ऐकून केविनला खूप धक्का बसला.

यानंतर तो त्याच मित्र केन ओस्टर ब्रोकसोबत दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार कव्हर करण्यासाठी गेला होता ज्यात केनचा मृत्यू झाला. फोटोवरील टीका अजून संपली नव्हती की केविन त्याच्या मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकून पूर्णपणे तुटला होता. केविनला दोन-दोन धक्के सहन झाले नाही आणि त्याने आपल्या आयुष्याचा शेवटच केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या