वॉशिंग्टन, 03 जून : कोरोनातून आता मोकळा श्वास मिळालेला आहे पण तरी जगावरील संकट टळलं असं नाही. पुढे आणखी किती तरी संकटं असू शकतात. याचा सामना करण्यासाठी आपण तयार राहायला हवं. अशाच एका संकटाबाबत नासा ने अलर्ट दिला आहे. काही दिवसांतच पृथ्वीवर सर्वात भयानक संकट येत आहे, असा इशारा नासाने दिला आहे. त्यामुळे सर्वांना धडकी भरली आहे. नासाने ज्या संकटाबाबत सावध केलं आहे. ते दुसरं तिसरं काही नाही तर उल्काचं संकट आहे. आकाशात अनेक खगोलीय वस्तू फिरत असतात. अशा वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना त्यांचे घनअस्तित्व संपून जाते आणि त्या जळून जातात. काही मोजक्याच उल्का या पाषाणाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो.
नासासह अनेक अवकाश संस्था अशा अवकाशातील उल्कांवर लक्ष ठेवून असतात. नासाने पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या नव्या उल्काच्या हालचालीची पुष्टी केली आहे. शास्त्रज्ञांनी त्याला 488453 (1994 XD) असं नाव दिलं आहे. NASA अंतराळात पाठवणार साप; आहे खास कारण, करणार मोठं काम येत्या दहा दिवसांत ते पृथ्वीच्या कक्षेतून जाणार आहे. ही उल्का या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खडक असल्याचे सांगितले जात आहे. हा उल्का 10 दिवसांत पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. 12 जून 2023 या तारखेला पृथ्वीवर हाहाकार माजण्याची शक्यता आहे. अवकाशातून उल्का पृथ्वीवर आदळणार असल्याच्या अशा बऱ्याच बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. हे सर्व अंदाज खरे ठरतात असं नाही. काही उल्का पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी असते. पण पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाने त्यांना खेचलं तर मोठी दुर्घटना घडू शकते. आकाशातील चमचमते तारे अचानक गायब कुठे झाले? समोर आलं सर्वात मोठं कारण आता असं तंत्रज्ञानही आलं आहे, ज्याच्या सहाय्याने ज्या उल्कापिंडांची पृथ्वीवर टक्कर होण्याची शक्यता जास्त आहे, त्यांना अवकाशातच वळवता येईल. यामुळे ते थेट समुद्रात पडतात आणि कोणतीही हानी होत नाही.