फ्लाईटमध्ये गोंधळ
नवी दिल्ली, 4 जुलै : विमान प्रवासादरम्यान अनेक विचित्र घटना घडतात. गेल्या काही महिन्यांपासून याचं प्रमाण वाढलं आहे. आत्तापर्यंत एकापेक्षा एक वाईट घटना घडल्याचं समोर आलंय. नुकताच विमानात वाद झाल्याची घटना समोर आलीय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती जोरात ओरडताना दिसत आहे, तर फ्लाइट अटेंडंट त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. हे प्रकरण 25 जूनचे मुंबई-डेहराडून फ्लाइटचे आहे. त्या व्यक्तीची मुलगी देखील फ्लाइटमध्ये प्रवास करत होती आणि तिने आरोप केला आहे की दुसऱ्या प्रवाशाने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वडिलांना कळताच त्यांनी विमानातच गोंधळ घातला. तो जोरजोरात आरडाओरडा करू लागला आणि आरोपी प्रवाशाला म्हणाला, तुझी माझ्या मुलीला हात लावण्याची हिम्मत कशी झाली?
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @gharkekalesh नावाच्या आयडीने ट्विटरवर शेअर केले आहे. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ 1 लाख 86 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, विमानात यापूर्वीही अनेक प्रकार समोर आलेत. कधी सीटवरुन भांडण तर कधी रागात सीटवरच लघवी, उलटी, कधी हाणामारी अशा अनेक घटना आत्तापर्यंत विमानात घडल्या आहेत. दिवसेंदिवस यापेक्षा अजून विचित्र घटना घडत आहेत. त्यामुळे काही लोकांना विमानाने प्रवास करायलाही भिती वाटायला लागलीय.